घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरSamruddhi Highway Accident: समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Samruddhi Highway Accident: समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Subscribe

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. नादुरुस्त कंटेनरला कार धडकल्यानं झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले

संभाजीनगर:समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. नादुरुस्त कंटेनरला कार धडकल्यानं झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले. ही घटना समृद्धी महामार्गावर संभाजीनगरच्या दौलताबादजवळ शुक्रवारी रात्री अकाराच्या सुमारास घडली. या अपघातात राहुल आनंद निकम ( वय 47 वर्षे) शिवानी वामनराव थोरात ( वय 58 वर्षे) आणि अण्णा रामराव मालोदे (71 वर्षे) या तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भाग अक्षरश: चक्काचूर झाला आहे. (Samruddhi Highway Accident Another terrible accident on Samruddhi Three died on the spot)

शनिवारी रात्री झालेल्या अपघातातील मृत शिवाजी थोरात हे बजाज कंपनीतून काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले होते. तसंच, यातील दुसरे मृत अण्णा मालोदे हे शेतकरी असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा एक मुलगा पोलीस दलात आणि दुसरा मुलगा बँकेत नोकरी करतो. तसंच, मृत राहुल निकम हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली असून, मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला

समृद्धी महामार्गावर दौलताबादजवळील माळीवाडा इंटरचेंजजवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. मात्र, अपघात एवढा भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवत शासकीय घाटी रुग्णालयात पाठवले. तसंच, यावेळी वाहतूक कोंडीदेखील झाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक गणेश गिरी, उपनिरीक्षक विनोद भालेराव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त कार क्रेनच्या साह्याने दूर करून वाहतूक सुरळीत केली. याबाबत पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा: Rane VS Jadhav : एक दिवस भास्कर जाधव यांना चोप देणार; नारायण राणेंची सभेत धमकी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -