घरताज्या घडामोडीधक्कादायक! सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू

धक्कादायक! सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू

Subscribe

सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे.

कोरोना काळात तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि सातत्याने हाताला सॅनिटायझर लावण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र, या सॅनिटायझरमुळे एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. सॅनिटायझरचा स्फोट होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमके काय घडले?

कोल्हापुरातील कागल तालुक्यातील बोरवडे भागात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबरला सुनीता काशीद आपल्या घरातील कचरा पेटवत होत्या. त्यावेळी त्या कचऱ्यात सॅनिटायझरच्या बाटलीचाही समावेश होता. त्या बाटलीमध्ये थोडेसे सॅनिटाझर शिल्लक होते. दरम्यान, कचऱ्याने पेट घेताच सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाला. यामध्ये सुनीता काशीद आगीत होरपळल्या. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

सॅनिटायझरचा अतिवापर

कोविड-१९ विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. या विषाणूपासून बचावासाठी आज मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा स्वच्छतेसाठी वापर होत असला तरी सॅनिटायझरच्या अतिवापराने त्वचेला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे वेळीच सावध होऊन हे लक्षात घेण्याची गरज आहे.

सॅनिटायझरच्या अतिरेकी वापराने हातावर फोड येण्यासारखे प्रकार घडतात. अशा अनेक तक्रारी गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. त्यामुळे आता त्वचेची काळजी घेण्यासाठी सॅनिटायझरचा किती वापर करावा, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लग्न सोहळ्यात जिल्हाधिकार्‍यांच्या पाकिटावर चोरट्याचा डल्ला


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -