घरमहाराष्ट्रथोडी जरी लाज वाटत असेल तर पोस्टर हटवा - संजय निरूपम

थोडी जरी लाज वाटत असेल तर पोस्टर हटवा – संजय निरूपम

Subscribe

वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरावरून शिवसेनेने शिवसेना भवनासमोर हेच का अच्छे दिन असे विचारत पोस्टर लावले होते. मात्र आता या शिवसेनेच्या पोस्टर बाजीवर आज भारत बंद दरम्यान काँग्रेसने जोरदार टीका केली. भारतबंदमध्ये सहभागी न झालेल्या शिवसेना ही देखील या महागाईला तितकीच जबाबदार असल्याचे सांगत जर शिवसेनेला थोडी जरी लाज वाटत असेल तर शिवसेनेने भाजपाविरोधात लावलेली सगळी पोस्टर काढून टाकावी अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. तसेच शिवसेना ही फलक लावण्यापुरतीच मर्यादित असून, शिवसेना भाजपाला घाबरत असल्याचा टोलाही अशोक चव्हाण यांनी यावेळी लगावला.

वाचा – भारत बंद आंदोलनात मनसेचा वरचष्मा

शिवसेने शिवाय आम्ही बंद यशस्वी केला  

दरम्यान आम्ही शिवसेनेशिवाय मुंबईमध्ये १०० टक्के यशस्वी बंद केल्याचा दावा संजय निरूपम यांनी केला असून, शिवसेना नेहमी सरकारच्या धोरणाविरोधात बोलण्याचे नाटक करते. ते जनतेच्या भावनेशी खेळतात. परंतु, त्यांच्या आजच्या भूमिकेमुळे त्यांचा पर्दाफाश झाला आहे. बंद १०० टक्के यशस्वी झाला. इतकेच काय शिवसेना भवनाखालील दुकानेही बंद होती, असे निरूपम यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

वाचा – महागाईने जनतेला नागडे केले – शिवसेना

सरकार विरोधकांना घाबरले – अशोक चव्हाण

या सरकारने काँग्रेसकडून पुकारण्यात आलेल्या बंदला दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे हे सरकार विरोधकांच्या एकजुटीला घाबरले असे यावरून दिसून येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -