घरटेक-वेकNokia कंपनीचा ५ कॅमेरांचा स्मार्टफोन!

Nokia कंपनीचा ५ कॅमेरांचा स्मार्टफोन!

Subscribe

'नोकिया ९' या नोकिया कंपनीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला एकूण ५ कॅमेरांचा सेटअप मिळणार आहे.

फोन निर्मितीमधील अग्रगण्य कंपनी Nokia लवकरच ग्राहकांसाठी एक नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे या फोनला १,२ नाही तर एकूण ५ कॅमेरे असणार आहेत. त्यामुळे फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी ही खुशखबरच म्हणावी लागेल. ५ कॅमेरे असलेल्या या मॉडेलचं नाव ‘Nokia 9’ आहे. ‘नोकिया ९’ ची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी ‘एमएचडी ग्लोबल’ या कंपनीकडून या फोनचे काही फोटो लिक झाले आहेत. एमएचडी ग्लोबल कंपनीकडे सध्या नोकिया कंपनीचे मालकी हक्क आहेत. दरम्यान सोशल मीडियामध्ये लिक झालेल्या ‘नोकिया ९’ या फोनमध्ये आपल्याला ‘पेंटा कॅमेरा’ अर्थात ५  कॅमेरांचा सेटअप पाहायला मिळतो. ज्यापैकी ३ कॅमेरे उभे तर अन्य दोन बाजूला २ अशी कॅमेरांची रचना आहे. याशिवय फोनच्या पुढल्या बाजूला एक सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे थोडक्यात नोकिया ९ या फोनमध्ये तुम्हाला एकूण ६ कॅमेरे मिळणार आहेत.


खुशखबर : आता लवकरच येणार इन्टाग्राम शॉपिंग अॅप

५ कॅमेरांचा भन्नाट नोकिया ९ फोन (सौ-Tech Advisor)

Nokia 9 फोनचे फिचर्स :

  • LED फ्लॅश आणि इन्फ्रारेड सेन्सर्स
  • 3D फेस अनलॉक फिचर
  • 5.9 / 6.1 इंच आकारमानाचा HD डिस्प्ले, गोरिला ग्लाससह
  • ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज
    
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -