घरमहाराष्ट्रSanjay Raut : बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला

Sanjay Raut : बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला

Subscribe

काँग्रेसचे सांगलीतील नेते विशाल पाटील यांनी या लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ज्यामुळे आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे.

नागपूर : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लोकसभेमुळे वादाला तोंड फुटले आहे. मविआच्या जागावाटपात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली असून या जागेवर त्यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ज्यामुळे काँग्रेसचे सांगलीमधील नेते विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशाल पाटलांनी सांगलीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मविआची डोकेदुखी वाढली आहे. पण याबाबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सल्ला दिला आहे. जर कोणी बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या विरोधात काम करत असेल, तर त्या पक्षाने त्यावर कारवाई केली पाहिजे, असे राऊतांकडून सांगण्यात आले आहे. (Sanjay Raut advises Congress to take action against Vishal Patil)

नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जर कोणी बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या विरोधात काम करत असेल, तर त्या पक्षाने त्यावर कारवाई केली पाहिजे. जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल, महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरोधात भूमिका घेत असेल आणि महाविकास आघाडीच्या पक्षातील लोक त्याच्यासोबत उभी राहत असतील, तर मला असे वाटते की, पक्षात जी शिस्तभंगाची भूमिका असते, ती घ्यायला हवी. त्या सगळ्यांची हकालपट्टी करायला हवी. मग पक्ष कोणताही असो. कोणत्याही पक्षाचे नाव घेत नाही, असे संजय राऊत यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Sanjay Raut : नरेंद्र मोदी 400 पार तर आम्ही 300 पार, संजय राऊतांचा दावा

काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी सांगलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीत काँग्रेसची ताकद असल्याचे म्हटले. त्यांच्या या विधानावर राऊतांनी निशाणा साधत म्हटले की, कोणाच्या पक्षाची किती ताकद आहे, हे लोक ठरवतील. त्याच सांगलीत गेल्या 10 वर्षांपासून भाजपाचे आमदार आणि खासदार निवडून येत आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसची परंपरा असताना, मोक्याच्या ठिकाणी भाजपा किंवा संघ परिवाराचे लोक निवडून येतात. असे असेल तर याला त्या पक्षाची ताकद मानत नाही. भाजपाला टक्कर द्यायची असेल तर, शिवसेनाच उभी राहायला हवी, असे आमचे धोरण आहे, असे राऊतांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

याचवेळी खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35+ जागा आणि इंडिया आघाडी देशात 305 जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होते असे सांगत म्हटले की, आम्ही आमच्या पक्षाकडे महाविकास आघाडी म्हणून आम्ही पाहतो. रामटेकमध्ये आम्ही काम सुरू केले आहे. ओपिनियन पोल येत आहेत, त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. आम्ही महाराष्ट्रात 100 टक्के यश मिळवायच्या मार्गावर आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा… Road Accident : राजकीय नेत्यांमागे अपघाताची पिढा; नाना पटोलेंनंतर माजी मंत्री डॉ. परिणय फुकेंच्या गाडीचा अपघात


 Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -