Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी गुंडांची बाजू घेऊ नका, गृहमंत्री असल्याचं भान ठेवा; संजय राऊतांचा पलटवार

गुंडांची बाजू घेऊ नका, गृहमंत्री असल्याचं भान ठेवा; संजय राऊतांचा पलटवार

Subscribe

खासदार संजय राऊत यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देण्याचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. संजय राऊतांचे हे आरोप फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यालाच संजय राऊतांनी पलटवार करत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. गुंडांची बाजू घेऊ नका, गृहमंत्री असल्याचं भान ठेवा, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सनसनाटी निर्माण करण्याचे शिक्षण तुमच्या प्रतिष्ठानमध्ये मिळत असेल. बाळासाहेब ठाकरे स्कूलमध्ये नाही. सेनेतून फुटून गेलेल्या आमदार आणि चिल्लर गद्दार महामंडळास इतका फौजफाटा कशासाठी? असा सवाल करताना चोर आणि गुंडांची बाजू घेऊ नका. गृहमंत्री आहात याचे भान ठेवा, असेही राऊत यांनी म्हटले.

- Advertisement -

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या आरोपावर उत्तर देताना त्यांना फक्त सनसनाटी निर्माण करायची असल्याचे म्हटले. सुरक्षेचे विषय राजकारणाशी जोडणं अतिशय चुकीचं आहे, कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप करणं हे त्याही पेक्षा चुकीचं असल्याचे फडणवीस म्हणाले होते.

- Advertisement -

मला मारण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली आहे, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाण्याचे पोलीस आयुक्त जगजित सिंग यांना पत्र लिहिले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनाही हे पत्र पाठवलं आहे. यावरून त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर आगपाखड केली आहे. ठाण्यातील गुंडांना जामिनावर सोडवून त्यांना टास्क दिला जातोय, असा मोठा आरोप त्यांनी केला आहे. तसंच, मला सुरक्षा नकोय. मी लाचार नाही. मी एकटा वाघ आहे, असं म्हणत तुम्ही विरोधकांना अशाप्रकारे संपवणार आहात का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आज त्यांनी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर आगपाखड केली.


हेही वाचा : गुंडांना जामिनावर सोडवून त्यांना टास्क दिला जातोय, संजय राऊतांचा पुन्हा मोठा आरोप


 

- Advertisment -