घरताज्या घडामोडीगांधींऐवजी जीनांना मारलं असतं तर ही वेळ आली नसती, मोदींच्या विधानावर संजय...

गांधींऐवजी जीनांना मारलं असतं तर ही वेळ आली नसती, मोदींच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Subscribe

फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? फाळणीची वेदना आता कशी शांत होणार?

नथुराम गोडसेंनी पाकिस्ताननिर्मितीचे गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोडसेंनी गांधींवर पिस्तुल रिकामं करण्यापेक्षा बॅ. जीना यांच्यावर गोळीबार केला असता तर फाळणीचा स्मृतिदिन ७५ वर्षांनंतर साजरा करण्याची वेळ आली नसती असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक मध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फळणीचा दिवस म्हणून ‘फाळणी वेदना दिन’ दरवर्षी स्मरण करण्याची घोषणा केली आहे. यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला आहे. संजय राऊतांनी मोदींच्या वक्तव्यावर टीका करत सध्याच्या अफगाणिस्तानचा संदर्भ दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, भारताची फाळणी हा एक भयपट होता. जनतेच्या ह्रदयातील घाव असून तो घाव अजूनही भरला गेला नाही. मात्र स्वातंत्र्यानंतर फाळणीला फक्त नेहरु, गांधी आणि काँग्रेसला जबाबदार ठरवण्याबाबत स्पर्धा सुरु आहे. कारण या लढ्यामध्ये काँग्रेसचे नेते अधिक असून स्वातंत्र्य वीर सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, लोहिया असे मोजके नेते होते. देश मुसलमानांना अधिक काही देणार नाही असे गांधींच धोरण होते. असं संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांनी देशाला आणखी एक नवा कार्यक्रम दिला. १४ऑगस्ट हा फाळणीचा स्मृती दिवस पाळायचा असे त्यांनी ठरवून टाकले. म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचा आनंद सोहळा व १४ ऑगस्ट म्हणजे एक दिवस आधी फाळणीच्या दुःखद आठवणींना उजाळा देण्याचा दिवस. एका देशाचे अस्तित्व आणि अखंडत्व खतम होण्याची वेदना काय असते ते आज आपण अफगाणिस्तानात अनुभवत आहोत. अराजकाच्या नरकात तो संपूर्ण देश आक्रोश करतोय. देशाला नरकात ढकलून अफगाणिस्तानचे राज्यकर्ते पळून गेले आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळत असतानाही काय घडत होते? देशाची फाळणी होऊ नये व देश अखंड राहावा असे वाटणारी मंडळी त्यावेळी काय करीत होती? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? फाळणीची वेदना आता कशी शांत होणार? त्यावर उपाय एकच. फाळणी करून तोडलेली भूमी पुन्हा आपल्या देशात सामील केली जाईपर्यंत राष्ट्रभक्त जनतेच्या मनात शांतता लाभणार नाही आणि देशातही शांतता नांदणार नाही. प्रत्येक हिंदूंच्या मनात ही फाळणीची जखम, अंतःकरणाच्या खोल कप्प्यात सदैव ठसठसत आहे. हिंदुस्थान पूर्वीप्रमाणे अखंड व्हावा असे प्रत्येकाला वाटत असले तरी ते शक्य दिसत नाही, पण आशा अमर आहे. पंतप्रधान मोदी यांना अखंड राष्ट्र करायचेच असेल तर स्वागतच आहे. पण फाळणी करून तुटलेल्या पाकिस्तानातील ११ कोटी मुसलमानांचे काय करणार? त्यावरही त्यांनी भाष्य करावे असं संजय राऊत यांनी रोखठोखमध्ये म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -