भाजपला अतिरिक्त उमेदवार देऊन गोंधळ निर्माण करायचाय, संजय राऊतांची टीका

एका उमेदवाराला जिंकण्यासाठी २७ मतांची गरज असून भाजपकडे ११३ तर महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. यामुळे या निवडणुकीमध्येसुद्धा अपक्षांची मत गेम चेंजर ठरणार आहेत.

MP Sanjay Raut criticized the Agneepath scheme

राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांवर १२ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. भाजपकडून राज्यसभेप्रमाणे आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीसुद्धा अतिरिक्त उमेदवार देण्यात आला आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून सहा उमेदवार देण्यात आले आहेत. अतिरिक्त उमेदवार देऊन भाजप राज्यात गोंधळ निर्माण करत असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपने अतिरिक्त उमेदवार दिल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.

राज्यातील राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. २० जून रोजी निवडणूक होणार असून भाजपच्या अतिरिक्त उमेदवारामुळे चुरस निर्माण झाली आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यातल पैशांचे राजकारण करुन भाजपला गोंधळ निर्माण करायचा आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला गोंधळाची स्थिती निर्माण करायची आहे. भाजपला राज्यात पैशांचे राजकारण करायचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेवर झालेल्या टीकेवरसुद्धा राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाषणा सर्व राजकीय मुद्यांवर भाष्य केलं आहे. काश्मिरी पंडितांवर सुरु असलेल्या अत्याचारावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधान परिषदेच्या १० जागांवर भाजपकडून सहा उमेदवार देण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्याकडून प्रत्येकी २ उमेदवार देण्यात आले आहेत. यामुळे १० जागांवर १२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. एका उमेदवाराला जिंकण्यासाठी २७ मतांची गरज असून भाजपकडे ११३ तर महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. यामुळे या निवडणुकीमध्येसुद्धा अपक्षांची मत गेम चेंजर ठरणार आहेत.

भाजप उमेदवार

1) प्रवीण दरेकर
2) राम शिंदे
3) श्रीकांत भारतीय
4) उमा खापरे
5) प्रसाद लाड
६) सदाभाऊ खोत

 

शिवसेना

1) सचिन अहिर
2) आमशा पाडवी

काँग्रेस

1) चंद्रकांत हंडोरे
2) भाई जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस

1) रामराजे नाईक निंबाळकर
2) एकनाथ खडसे


हेही वाचा : अपक्ष आमदारांना मत दाखवता येणार का?; केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं