घरमहाराष्ट्रSanjay Raut: मविआत सगळं आलबेल; मात्र वंचितशी जुळेना

Sanjay Raut: मविआत सगळं आलबेल; मात्र वंचितशी जुळेना

Subscribe

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्वच पक्ष जोमाने उतरले आहेत. राज्यात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर मविआमध्ये वादाची ठिगणी पडली. काँग्रेसने सांगलीच्या जागेवरून ठाकरे गटाबाबत उघड नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मविआत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना विचारलं असता, त्यांनी मविआत सगळं आलबेल असल्याचं म्हटलं आहे. परंतु, असं जरी असलं तरीही दुसरीकडे मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी जुळत नसल्याचंच दिसून येत आहे. (Sanjay Raut Everything will be covered in this But do not match with the deprived)

कालच (28 मार्च) प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत पाठीत खंजीर खुपसत असल्याचा फोटो शेअर करत, किती खोटं बोलणार असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर आज यावर राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना थेट उत्तर देणं टाळलं आहे. त्यांची प्रतिक्रिया सौम्य स्वरुपाची होती.

- Advertisement -

राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांना आतापर्यंतच्या अनेक बैठकांना बोलावण्यातही आलं होतं. तसंच, संविधान वाचवण्याची जबाबदारी ही आम्हा सर्वांची आहे. त्यामुळे आम्ही प्रकाश आंबेडकर यांना आवाहन करतो की त्यांची भूमिका भाजपाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणार नसावी.

या जागा आमच्याच, लवकरच नावं जाहीर करणार

पालघर, हातकणंगले, जळगाव, कल्याण डोंबिवली आणि मुंबई उत्तर या जागा शिवसेनेच्याच आहेत( ठाकरे गट). त्यामुळे या जागांची यादी लवकरच जाहीर करणार, अशी माहिती देत त्यांनी थेट काँग्रेस आणि शरद पवार गटाला आव्हान दिलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Stone Pelting At Shirsoli: जळगावात शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक; अनेक जखमी )

मनमोहन सिंह यांची जाहीर माफी मागा

प्रफुल पटेल एअर इंडिया विमान लीज प्रकरणी CBI कडून तपास बंद करण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांना या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची जाहीर माफी मागावी, असं राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -