घरमहाराष्ट्रStone Pelting At Shirsoli: जळगावात शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक; अनेक जखमी

Stone Pelting At Shirsoli: जळगावात शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक; अनेक जखमी

Subscribe

शिरसोली: जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. गावतील गल्लीत शिवजंयतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीवर अचानकपणे दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना आज रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी व नागरिक जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 5-6 संशयितांनादेखील ताब्यात घेतले आहे. (Stone Pelting At Shirsoli Stone pelting at Shiv Jayanti procession in Jalgaon Many injured)

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार दि. 28 मार्च रोजी सायंकाळी इंदिरा नगर येथून शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मिरवणूक वराड गल्ली येथे आली असता तेथे काही काळ ढोलताशे बंद करण्यात आले. अचानक अज्ञात लोकांनी मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. दगडफेकीने मोठी तारांबळ उडाली आणि तणाव निर्माण झआला. नागरिकांच्या अंगावर आणि काहींच्या घरावरदेखील दगड पडले.

- Advertisement -

संशयितांची धरपकड सुरू

या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड हे घटनास्थळी सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यासोबत दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेत मंगशे साहेबराव पाटील (वय 30), बाळू तुळशीराम पाटील (45), विशाल दिलीप पाटील (25) यांच्यासह काही पोलीस कर्मचारी आणि 5 ते 6 नागरिक जखमी आहेत. घटनास्थळी अजूनही तणावाचे वातावरण असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे पोहोचले असून माहिती घेत आहेत. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू असून संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा: Meenakshi Patil Passed Away: शेकाप नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -