घरताज्या घडामोडीमुंडे, महाजन, पर्रिकरांची पुढची पिढी कुठे आहे ? संजय राऊतांचा भाजप...

मुंडे, महाजन, पर्रिकरांची पुढची पिढी कुठे आहे ? संजय राऊतांचा भाजप नेतृत्वाला सवाल

Subscribe

शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या युतीच्या मुद्द्यावर घमासान सुरू आहे. युतीमध्ये कोण सडल या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शेअर केलेल्या ट्विटवरून आणखी वादात भर पडली आहे. या ट्विटला पूनम महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण पूनम महाजन यांच्या निमित्ताने भाजपसाठी योगदान देणाऱ्या कुटुंबांची पुढची पिढी काय करते असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

 

आक्षेप असता तर ४० वर्षांपूर्वीच घेतला असता

मी ट्विट केलेले व्यंगचित्र हे मी काढलेले नाही. ते व्यंगचित्र हे एक राजकीय तटस्थ भूमिका असणाऱ्या व्यंगचित्रकाराचे म्हणजे आर के लक्ष्मण यांचे व्यंगचित्र आहे. त्यामध्ये प्रमोद महाजन यांचा उल्लेख असल्याने पूनम महाजन यांना अस्वस्थ होण्यासारखी गोष्ट नाही. प्रमोद महाजनांना आक्षेप असता तर त्यांनी ३५ ते ४० वर्षांपूर्वीच आक्षेप घेतला असता. सध्या पूनम महाजन भाजपच्या खासदार आहेत. त्या नक्की कुठे असतात असाही सवाल शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

मुंडे, पर्रिकर, महाजनांची पुढची पिढी करते काय ?

भाजपच्या वाढीमध्ये गोपिनाथ मुंडे, मनोहर पर्रिकर, प्रमोद महाजन यांचे मोठे योगदान आहे. पण या कुटुंबाची पुढची पिढी नेमकी कुठे आहे ?असा सवाल संजय राऊत यांनी केला. पूनम महाजन भाजपच्या खासदार आहेत. त्या सध्या कुठे असतात हादेखील सवाल त्यांनी केला. प्रमोद महाजन यांच्या संबंधित केलेले ट्विट ही त्या काळातील परिस्थिती होती. ती टीका प्रमोदजींवर व्यक्तीगत केली नव्हती. प्रमोद महाजन यांचे जसे राजकीय पक्षाशी संबंध चांगले होते, तसेच जिव्हाळ्याचे संबंध हे शिवसेनेसोबतही होते. त्यामुळेच शिवसेनेतही ते अतिशय जवळचे होते.

काय म्हणाल्या होत्या पूनम महाजन 

संजय राऊत यांनी प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित कार्टूनिस्ट आर के लक्ष्मण यांनी काढलेले ट्विट शेअर केले होते. या ट्विटला उत्तर देताना पूनम महाजन म्हणाल्या की, ”स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.” पण संजय राऊत यांनी नंतर हे ट्विट आपल्या अकाऊंटवरून डिलिट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -