घरताज्या घडामोडीहनुमान चालिसेला महाराष्ट्रात विरोध नाही, कारागृहात बसूनही वाचू शकता; संजय राऊतांचा राणांना...

हनुमान चालिसेला महाराष्ट्रात विरोध नाही, कारागृहात बसूनही वाचू शकता; संजय राऊतांचा राणांना टोला

Subscribe

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांनाही वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी ही येत्या २९ तारखेला होणार आहे. हनुमान चालिसेला महाराष्ट्रात विरोध आहे का? देशात कुठेच विरोध नाहीये. हनुमान चालिसेला कोणी विरोध केला? ते कारागृहात बसूनही वाचू शकतात, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.

हनुमान चालिसेला महाराष्ट्रात विरोध नाही

संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, हनुमान चालिसेला महाराष्ट्रात विरोध आहे का? देशात कुठेच विरोध नाहीये. हनुमान चालिसेला कोणी विरोध केला? आता त्यांना कुठल्यातरी जेलमध्ये पाठवलंय आर्थर रोड आणि भायखळा. तिथे त्यांनी हनुमान चालिसा वाचावी. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन वाचावी, एखादं मोठं सभागृह घ्यावं तिथे त्यांनी वाचावं. या महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक हिंदुंच्या कार्यक्रमाला कोणीच विरोध केलेला नाही. पण तुमचा जो हट्ट आहे, मी मातोश्रीत घुसून वाचेल, तुम्ही घुसून वाचणार मग आम्हीही घुसू. तुमच्या बापाचं राज्य आहे का?, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. प्रत्येक कारवाई कायद्याने होत आहे. अलीकडच्या काळामध्ये पोलिसांनी जे चित्र पाहिलं. राणा दाम्पत्यांच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये धार्मिक उद्रेक घडवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. सदावर्ते आणि आताच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष आहे. हे खूप मोठं षडयंत्र आणि कारस्थान आहे. त्यांच्या वतीने जी कलमं त्यांच्यावर जी लावण्यात आली आहेत. ती योग्य आहेत, असं मला वाटतं. अशा प्रकारचं राज्य उलथवण्याचा कट धर्माच्या नावावर कुठेही होऊ. अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीने अशी कारस्थानं करत असतील तर त्यांच्यावरती नक्कीच राजद्रोहाचा खटला दाखल होतो, असं राऊत म्हणाले.

राज्यपाल सुद्धा त्यांचेच आहेत

सदावर्ते प्रकरणातही हेच झालंय. राज्य उठवायचं, राज्य अस्थिर करायचं. लोकांना भडकवायचं, नेत्यांच्या घरावर चाल करून जायचं. तिथे शरद पवारांच्या घरावर गेले आता येथे मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलीस असले तरीदेखील शिवसैनिक हे प्रतिकार करतात. संघर्ष निर्माण करून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करायची. राज्यपाल सुद्धा त्यांचेच आहेत. त्यामुळे राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची. अशा प्रकारचे उद्योग यांचे सुरू आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार, अजित पवार तसेच दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते हे सर्व राज्य सक्षमपणे पुढे नेताहेत. त्यामुळे यांचा प्रत्येक कट उधळला जात आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्व शिकवायला त्यांच्याच दारात जात असाल तर… – जयंत पाटील


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -