संजय राऊत उद्या ईडी चौकशीला हजर राहणार

पत्राचाळ गैरव्यवहाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीचे समन्स आले आहे. त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावले असून राऊत उद्या जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.

sanjay raut

पत्राचाळ गैरव्यवहाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीचे समन्स आले आहे. त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावले असून राऊत उद्या जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच, या चौकशीदरम्यान, डीएचएफएलसंबंधितही चौकशी केली जाऊ शकते, अशी माहिती आहे. (sanjay raut will appear in the ed office tomorrow for questioning)

हेही वाचा आता आपले मार्ग वेगळे, संजय राऊतांनी बंडखोर शिंदे गटाला स्पष्टच सांगितलं

काय आहे प्रकरण

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीनप्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते, मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असा आरोप आहे.

हेही वाचा – राज्यपालांनी बोलावलेलं विधानसभेचे विशेष अधिवेशन स्थगित

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणार्‍या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार घरांचे बांधकाम करायचे काम दिले होते. त्यापैकी ६७२ घरे येथील भाडेकरूंना द्यायची होती. उर्वरित घरे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती, परंतु २०१०मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.