घरताज्या घडामोडीईडीची नोटीस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी प्रेमपत्र, संजय राऊतांचा भाजपला टोला

ईडीची नोटीस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी प्रेमपत्र, संजय राऊतांचा भाजपला टोला

Subscribe

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजपकजडून बिनबुडाचं राजकारण करण्यात येत आहे.

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस देण्यात आली आहे. तर शिवेसना खासदार भावना गवळी यांच्या मालमत्तेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. भाजपकडून सूडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ईडीची नोटीस म्हणजे राजकीय नेत्यांसाठी प्रेमपत्र असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही दिवस येतील असा इशाराच संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. अनिल परब चौकशीला सामोरे जातील असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ईडीची नोटीस म्हणजे महाविकास आघाडीतील राजकीय नेत्यांसाठी डेथ वॉरंट नाही तर प्रेमपत्र आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकर पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आली. सरकार पडलं नाही यामुळे आता भाजपकडून राजकीय नेत्यांसाठी प्रेमपत्र पाठवण्यात येत आहे. अनिल परब यांना भाजप नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे. अनिल परब ईडीच्या कारवाईला संपुर्ण सहकार्य करतील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

संजय राऊतांचा इशारा

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजपकजडून बिनबुडाचं राजकारण करण्यात येत आहे. दिल्लीत सरकार असल्यामुळे राज्यातील नेत्यांमागे तपास यंत्रणांचा ससेमीरा लावण्यात येत आहे. यावर संजय राऊत यांनी दिल्लीत आमचेही दिवस येतील असे म्हटलं आहे. दिल्ली आमचेही दिवस येतील असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. आम्ही काहीही असेल तर चौकशीला समोरे जाऊ कर नाही त्याला डर कशाला असेही राऊत यांनी म्हटलं आहे.

ईडी आणि भाजपची हातमिळवणी

भाजपने ईडीसोबत हातमिळवणी केली आहे. यामुळे पहिली याची चौकशी केली पाहिजे. भाजपचा प्रतिनिधी ईडीच्या कार्यालयात बसला आहे का? पाहावं लागेल असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तुम्ही काही गोष्टी खणून काढताय, खणत राहा पण जो खड्डा खणत आहात त्यामध्ये तुम्ही देखील पडाल असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही दिवस येतील – संजय राऊत


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -