घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसावरकरांचे देशासाठीचे योगदान महत्वाचे : छगन भूजबळ

सावरकरांचे देशासाठीचे योगदान महत्वाचे : छगन भूजबळ

Subscribe

मोर्चेकरयांनी सावरकरांचे हिंदुत्वही स्विकारावं

नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलणे टाळले असते तर बरे झाले असते. ते काय बोलले कोण काय म्हणाले या इतिहासात जाण्यात अर्थ नाही. आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत याविषयी चर्चा होणे गरजेचे आहे असे सांगत या विषयावरून रस्त्यावर उतरणार्‍यांनी निदान सावरकरांचे हिंदुत्व स्विकारावे असा टोला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीप्रसंगी सावरकर, राहुल गांधी, राजकारण, आरक्षण आदींवर त्यांनी प्रकाश टाकला. भुजबळ म्हणाले, राहुल गांधी यांनी असे बोलायला नको होते. भारत जोडो यात्रेचा उददेश चांगला. आतापर्यंत माध्यमे यात्रेकडे फिरकत नव्हते, राहुल गांधी यांच्या बोलण्यामुळे निदान माध्यम यात्रा दाखवू लागले आहेत. सावरकर यांनी देशासाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे परंतू काही लोक त्यांचा राजकारणासाठी वापर होत आहे अशी टिका त्यांनी केली. त्यांनी कारावास भोगला, याबाबद्दल आदर आहे. सावरकरांनी नागरिकांनी उपदेशपर संदेश दिले असून गाय उपयुक्त पशु आहेत, परंतू भाकड जनावरांची विल्हेवाट लावण्याबाबत त्यांनी मत मांडले आहे. या सावरकरांच्या शास्त्रीय विचारांचा अंगीकार करा, निवडक सावरकर घेणे योग्य आहे का असेही भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

राहुल गांधी बोलले मग त्यावर कुणीतरी दाखले दिले. कुणी पत्र दाखवले याच्या खोलात मला जायचे नाही. मी काही इतिहासकार नाही. परंतु, जे आज मोर्चे काढताहेत त्यांच्या मातृसंस्थेचे स्वातंत्र्य लढयात योगदान काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केंद्राने दिलेल्या आरक्षणाबाबत बोलतांना ते म्हणाले, मागासवर्गीयांच्या आरक्षणाला असलेली घटनेची ५० टक्क्यांची मर्यादा आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिथिल करता येते तर मग मराठा आरक्षणासाठी ही मर्यादा शिथिल का केली जात नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत का ठेवला जातो आहे असा सवाल उपस्थित करत आर्थिक आरक्षणामुळे आता आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. मग आता मराठा समाजाला १० टक्के आणि आदिवासी बहुल स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसी घटकाला त्यांच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण द्या अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -