घरमहाराष्ट्रपुण्यात मिनी लॉकडाऊन, विद्यापीठामार्फत सराव परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुण्यात मिनी लॉकडाऊन, विद्यापीठामार्फत सराव परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Subscribe

पुण्यात सात दिवसांच्या लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून मुंबई, नाशिक पाठोपाठ पुण्यात देखील कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सात दिवसांच्या लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुण्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा यंदा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. नुकतंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सराव परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सत्र परीक्षा १० एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. यासोबतच ५ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीदरम्यान, सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. या सराव परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा देणं विद्यार्थ्यांना सोयिस्कर जाणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही ऑनलाईन परीक्षा नेमकी कशी असेल याची तांत्रिक बाजू विद्यार्थ्यांना समजावी या हेतूने ही सराव परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे. ५ ते ९ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३या वेळात ही सराव परीक्षा होणार आहे. या संदर्भातील एक परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

- Advertisement -

विद्यापीठाकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, पहिल्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक टप्याटप्याने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे तर घेण्यात येणारी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असणार आहे. यासोबतच प्रथम वर्षापासून ते अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर आणि मोबाईल क्रमांकवर माहिती देण्यात येणार आहे. sppuexam.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -