घरमहाराष्ट्रचला घंटा वाजली,शाळा भरली

चला घंटा वाजली,शाळा भरली

Subscribe

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

मुंबई, ठाणे व नवी मुंबई वगळता संपूर्ण राज्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी शाळेची घंटा वाजली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे वर्षभर ओस पडलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या. कोरोनामुळे थोडेसे भीतीचे वातावरण असल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असली तरी त्यांच्यामध्ये उत्साह दिसून येत होता.

प्रवेशद्वारावर सॅनिटायझर… थर्मल चेकिंगच्या मशीनने तपासणी… बाकांमध्ये योग्य अंतर… अशी योग्य ती काळजी घेत बुधवारपासून राज्यभरातील पाचवी ते आठवीचे वर्ग असलेल्या सुमारे 97 हजार 814 शाळा सुरू झाल्या. यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित, अशंत: अनुदानित, जिल्हा परिषदेच्या, खासगी शाळांचा समावेश आहे. पाचवी ते आठवीदरम्यान मुंबई,ठाणे व नवी मुंबई वगळता राज्यभरामध्ये तब्बल 65 लाख 43 हजार विद्यार्थी आहेत. मात्र, शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती फारच कमी दिसून आली. पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नसल्याने त्याचा परिणामही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर दिसून आला. सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांची थर्मल तपासणी केली जात होती. तर शाळेच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश करताना मास्क बंधनकारक करण्यात आले होते.

- Advertisement -

शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन मुलांच्या व शिक्षकांसोबत शाळा सुरू झाल्याबद्दल संवाद साधला. यावेळी शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष कुमार, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक व शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांनी सकाळी पुणे महापालिका हद्दीतील आपटे प्रशाळा व मॅार्डन शाळा या दोन खासगी व हुतात्मा शिरीष कुमार या मनपाच्या शाळेतील नववी ते दहावी इयत्तेच्या शाळेलाही भेट दिली. त्याचबरोबर हिंजवडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही त्यांनी भेट देत विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेऊन शाळा सुरू केल्या आहेत. जी मुले आजारी आहेत किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहेत अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहनही प्रा. गायकवाड यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -