घरमहाराष्ट्रनाशिकश्री सप्तश्रुंगी हिल मॅरेथॉनमध्ये यंदा शालेय विद्यार्थीही धावणार

श्री सप्तश्रुंगी हिल मॅरेथॉनमध्ये यंदा शालेय विद्यार्थीही धावणार

Subscribe

सप्तश्रुंगी गडावर ३ डिसेंबरला रंगणार मॅरेथॉन, उपक्रमाचे यंदाचे ७ वे वर्ष

श्री सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्ट व नाशिक रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री सप्तश्रुंगी हिल मॅरेथॉनमध्ये यंदा शालेय विद्यार्थ्यांनाही सहभागाची संधी मिळणार आहे. आयोजकांनी या विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट प्रकाराचा समावेश केला आहे. गेल्या ७ वर्षांपासून सुरू असलेल्या या मॅरेथॉनसाठी नावनोंदणी सुरू झाली असून, त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

आरोग्य जनजागृतीसह दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना मैदानी क्रीडा प्रकारातील संधी उपलब्ध व्हाव्यात, निसर्ग व पर्यटन विकासही साधला जावा, या व्यापक उद्देशाने श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स, नाशिक यांच्या वतीने २०१७ पासून सप्तश्रुंगी हिल मॅरेथॉनचे आयोजन केले जाते आहे. श्रीक्षेत्र सप्तशृंगगड व नांदुरी ग्रामपंचायतीसह व्यापारी संघटनांच्या सहयोगाने ३ डिसेंबर २०२३ रोजी ही स्पर्धा रंगणार आहे. २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर या तीन टप्प्यांत महिला व पुरुषांना सहभाग घेता येणार आहे.

- Advertisement -

असा आहे स्पर्धेचा मार्ग

नांदुरी पायथ्यापासून सप्तशृंगी गड आणि परत नांदुरी पायथ्यापर्यंत असा स्पर्धेचा मार्ग आहे. ही मॅरेथॉन सकाळी ६ वाजता सुरू होईल. नाशिक रनर्ससह इतर अनुभवी संस्थांमाध्यमातून स्पर्धेसाठी आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता केली जाणार आहे.

येथे करा नावनोंदणी

https://runindia.in/events/saptashrungi-Hill-marathon-2023 या लिंकवर मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी इच्छुकांना आपली नावनोंदणी करता येईल. नावनोंदणी १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंतच करता येईल. अधिकाधिक नाशिककरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी श्री सप्तश्रुंगी निवासिनी देवी ट्रस्ट, नासिक रनर्स नासिक, सप्तशृंगगड व नांदुरी ग्रामपंचायत आणि व्यापारी संघटना प्रयत्नशील आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -