घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशोध बेपत्ता मुलींचा : अल्पवयीनांची प्रेमप्रकरणं रोखण्यासाठी हवा मुलांशी संवाद

शोध बेपत्ता मुलींचा : अल्पवयीनांची प्रेमप्रकरणं रोखण्यासाठी हवा मुलांशी संवाद

Subscribe

मानसरोग तज्ज्ञ डॉ. नीलम मुळे यांचा पालकांना सल्ला

नाशिक : पालक आणि मुलामुलींमधील संवाद मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने कमी झाला आहे. परिणामी, मुलेमुली किशोरवयात प्रेमप्रकरण, नैराश्य, आत्महत्या, वाम मार्गाला जात आहेत. याचे प्रमाण नाशिक शहरात वाढले आहे. पालकांनी मुलांशी मनमोकळेपणे नियमित संवाद ठेवावा, असा मोलाचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलम मुळे यांनी  ‘माय महानगर’शी बोलताना दिला.

डॉ. मुळे पुढे म्हणाले की, किशोरवयात अनेक मुलामुलींनी बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड असतात. त्यातून इतर मुलामुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. पूर्वी कुटुंबामध्ये मोबाईलचा वापर कमी होता. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होत होते. मात्र, आता आई, वडील, मुले, मुली मोबाईलच्या आहारी गेले आहेत. सर्व जण एकमेकांशी कमी बोलतात. अनेक जण फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामवर सक्रिय असतात. पण घरातील सदस्यांसोबत जेवण व चर्चासुद्धा करत नाहीत. मुलेमुली आईवडिलांसह आजूबाजूच्या नागरिकांचे अनुकरण करत असतात आईवडील घरात वेबसिरीज, सिनेमा पाहतात. त्यामध्ये हिंसक दृश्य, हाणामारी, विवाहबाह्य संबंध, फावणुकीच्या घटना दाखविल्या जातात. त्यातून मुलामुलींना सिनेमातील शिवीगाळ, अपहरण, मारहाणीच्या दृश्यांप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. ते चांगले की वाईट हे मुलामुलींना माहिती नसते. पूर्वी घरामध्ये संवाद असायचा.

- Advertisement -

आईवडील मुलांशी गप्पागोष्टी करायचे. सर्वजण एकत्रित नातेसंबंध व ऐतिहासिक सिनेमा व मालिका पाहिल्या पाहिजेत. मात्र, हल्ली अनेकजण आपआपल्या मोबाईलवर मालिका, आवडते दृश्य पाहत आहेत. त्यातून नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. किशोरवयात मुलेमुली आईवडील घराबाहेर गेले ते दिवसभर आपापल्या मित्रमैत्रिणींसोबत असतात. त्यांचे पालक रात्री घरी आले की ते मुलांशी संवाद साधत नाहीत. त्यातून मुलांना घराबाहेरील व्यक्तीच जवळच्या वाटू लागतात. त्यातून अनेक मुलेमुली खासगी आयुष्यातील प्रसंगी प्रिय व्यक्तीशी शेअर करतात. मात्र, समोरील व्यक्ती त्याचा गैरफायदा घेते. दुर्दैवाने, ही बाब पालकांच्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो.

अनेक मुलींना प्रेमप्रकरण, नोकरी, पैशाचे आमिष दाखवल्याचे समोर आले आहे. त्यातून अनेक मुली अत्याचाराला बळी पडल्या आहेत. पीडित मुलामुलींशी पालक अल्पसंवाद ठेवतात. त्यातून मुलेमुली आणखीच दुखावले जातात. ते मानसिक ताणतणावात राहून टोकाचा निर्णय घेतात. घरात कोणीही त्यांना जवळचे वाटत नाही आणि घराबाहेर कोणीही आपले कोण ऐकत नाही, या विचाराने ते आत्महत्येचा निर्णय घेतात. यातून मुलामुलींना बाहेर काढण्यासाठी पालकांनी दररोज मुलामुलींशी संवाद ठेवला पाहिजे. आपली मुलेमुली दिवसभर काय करतात, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, मुलामुलींना काही अडचणी आहेत का, किशोरवयात होणारे शारीरिक बदल व त्याचे परिणाम, याबाबत पालकांनी मुलामुलींशी संवाद साधला पाहिजे. तरीही, मुलेमुली ऐकत नसतील तर पालकांनी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने त्यांना बोलते केले पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -