घरताज्या घडामोडीकाँग्रेसचे जेष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

काँग्रेसचे जेष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी आमदार तसेच काँग्रेसची कामगार चळवळ असलेल्या इंटकचे अध्यक्ष असलेले जयप्रकाश छाजेड यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. मंगळवारी (दि.१०) नागपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या बैठकीसाठी छाजेड निघत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. ७५ वर्षांचे छाजेड काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे आणि जाणते नेते म्हणून राज्यभरात परिचित होते.प्रकृती अस्थावस्थेमुळे जयप्रकाश छाजेड मागील काही वर्षांपासून राजकीय घडामोडीत सक्रिय नव्हते. मात्र, पक्षाच्या राज्यभरातील अनेक नेते, कार्यकर्ते यांच्यासाठी नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत ते राहिले. नाशिक शहरावर तसेच जिल्ह्यावर त्यांचे नितांत प्रेम तर होतेच शिवाय नाशिकच्या एकूण जडणघडणीचा जवळून बघितलेले आणि नाशिकच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राचा अभ्यास असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. सर्व पक्षीय कार्यकर्त्यासाठी जयप्रकाश छाजेड हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले. एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात करून युवक काँग्रेस, काँग्रेस पक्षाची राज्य कार्यकारणी, इंटकचे अध्यक्ष अश्या अनेक पदांवर त्यांनी मागील पाच दशक काँग्रेस पक्षाची सेवा केली. छाजेड यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि जवळचे मित्र विलासराव देशमुख यांच्या सोबत त्यांचे विशेष सख्य राहिले. जयप्रकाश छाजेड यांनी विधान परिषदेवरही काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे.

मंगळवारी (दि.१०) नागपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीसाठी जयप्रकाश छाजेड निघाले होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना काळजी घेण्यास सांगितले परंतु पक्षाची महत्वपूर्ण बैठक असल्याने छाजेड यांनी जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यांना तीव्र हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. छाजेड यांच्या मृत्यूची बातमी समजताच नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात काँग्रेस नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -