घरमहाराष्ट्रपुण्यात सर्व्हिस रोडची भिंत कोसळली

पुण्यात सर्व्हिस रोडची भिंत कोसळली

Subscribe

पुण्यातील कालव्याची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील सर्व्हिस रोडची भिंत पुन्हा एकदा कोसळ्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातल्या जनता वसाहतीजवळ ही घटना घडली आहे. देशपांडे पूल उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याची संरक्षक भिंत कालव्यात कोसळल्याचे समोर आले आहे. या भिंतीचा १५ ते २० मीटर भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी भिंत पोखरल्याने कालव्याच्या संरक्षक भिंतीचा भाग कालव्यात कोसळला आहे. त्यामुळे कालव्याला लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळ्याही तुटून पडण्याच्या स्थितीत असून कालव्यात पाणी सोडल्यानंतर हा रस्ता खचून दुर्घटना होण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी केले होते

पर्वती पायथ्याला असलेल्या जनता वसाहतीसाठी कालव्याच्या हा बाजूला रस्ता आहे. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती महापालिकेकडून केली जाते. तर कालव्या लगतच हा रस्ता असल्याने त्या ठिकाणी सुरक्षा जाळ्याही लावण्यात आलेल्या आहेत. या रस्त्याचे दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपासून हा रस्ता कालव्यात खचत चालला असून रस्त्याच्या बाजुने मोठ्या भेगा पडल्या आहेत. दरम्यान सध्या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद असून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतर हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कालव्यामुळे रस्ता अपघाताचा धोका

जनता वसाहतमध्ये जाणारा हा वर्दळीचा रस्ता आहे. त्याचा वापर दुचाकी चालक आणि पादचारी मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे रस्ता अचानक खाचल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांकडून या ठिकाणी बॅरिकेड लावून वर्दळ थांबविली असली तरी तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -