घरमहाराष्ट्र'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्यास तयार'

‘अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्यास तयार’

Subscribe

वेळ पडल्यास अवनी वाघिणीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्यास तयार असल्याचं वादग्रस्त शिकारी शआफत अली खाननं म्हटलं आहे.

अवनी अर्थात टी – १ वाघिणीला ठार केल्यानंतर सुरू झालेल्या वाद अद्याप शमलेला नाही. याप्रकरणामधील वादग्रस्त शिकारी शआफत अली खान यांनी वेळ पडल्यास अवनी वाघिणीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं देखील शआफत अली खान यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मनेका गांधी यांनी माझी बदनामी केली असून त्यांना कोर्टात खेचणार असल्याचं देखील म्हटलं आहे. एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. यावेळी शआफत अली खान यांनी अवनीचे बछडे देखील नरभक्षक असल्याचा पुनरूच्चार केला. कारण जेव्हा अवनी शिकार करत होती. त्यावेळी बछडे देखील तिच्यासोबत होते असा दावा शआफत अली खान यांनी केला आहे. अवनीचा मुद्दा सध्या राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. त्यामध्ये रोज नवे – नवे दावे आणि खुलासे केले जात आहेत.

वाचा – राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून सरकारला ‘अवनी’ फटकारे!

अवनी प्रकरण आहे तरी काय? 

नरभक्षक असल्यानं अवनीला ठार करण्याचे आदेश दिले गेले. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी अवनी वाघिणीला यवतमाळ येथे गोळ्या घालून ठार करण्यात आलं. अवनीला ठार करण्यापूर्वी तिला बेशुद्धीचे इंजेक्शन दिलं नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे वाद आणखीन उफाळला. दरम्यान, सोशल मीडियासह मीडियामध्ये देखील राज्य सरकारवर टिका झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. दोघांमध्ये आरोप – प्रत्यारोप देखील जोरात झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी आयोग नेमण्याची घोषणी केली. तर सत्ताधारी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं देखील भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील व्यंगचित्र काढत राज्य सरकारवर फटकारे ओढल. त्यामध्ये आता याप्रकरणामधील वादग्रस्त शिकारी शआफत अली खान यांनी वेळ पडल्यास अवनी वाघिणीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

वाचा – अवनी हत्या प्रकरणाची ५ न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी – मुनगंटीवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -