घरमुंबईअवनी हत्या प्रकरणाची ५ न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी - मुनगंटीवार

अवनी हत्या प्रकरणाची ५ न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी – मुनगंटीवार

Subscribe

मुनगंटीवार यांनी अवनीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. अवनीच्या बछड्याची पूर्ण काळजी घेतली जाईल याची व्यवस्था केली आहे. काही एनजीओ त्यासाठी चांगले काम करत असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांमार्फेत चौकशी व्हावी, अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुनगंटीवार यांनी अवनीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. अवनीच्या बछड्याची पूर्ण काळजी घेतली जाईल याची व्यवस्था केली आहे. काही एनजीओ त्यासाठी चांगले काम करत असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. जे लोक अवणीच्या मृत्यूबद्दल अश्रू ढाळत आहेत, त्यांनी तिच्या हल्ल्यात मृत पावलेल्या त्या शेतकऱ्यांबद्दलही अश्रू ढाळावेत असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

अवनीच्या प्रश्नावर आत्तापर्यंत मी सतत भूमीका मांडत आलो आहे. शिवसेना अवनी हत्या प्रकरणावर खूप आरोप करत आहे. मात्र ५० मिनिटे सभागृहात उपस्थित असून सुध्दा या विषयावर सेनेच्या एकाही मंत्र्याने आपल्यासमोर काहीच म्हटले नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. अवनीच्या मृत्यू प्रकरणाची निवृत्त नायाधिशांमार्फत नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या – 

राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून सरकारला ‘अवनी’ फटकारे!

अवनीच्या हत्येविरोधात शिवाजीपार्कमध्ये ग्लोबल मार्च

अवनीच्या हत्येविरोधात आंदोलन; निरुपम यांना आंदोलनकर्त्यांनी हकलवले

अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन

अवनीबाबत पोस्टमॉर्टममधून धक्कादायक माहिती समोर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -