घरमहाराष्ट्रगुवाहाटीतील झाडे, डोंगर पाहणाऱ्या शहाजीबापूंना करायची आहे ताडोबा सफारी

गुवाहाटीतील झाडे, डोंगर पाहणाऱ्या शहाजीबापूंना करायची आहे ताडोबा सफारी

Subscribe

मुंबई : काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल… या डॉयलॉगमुळे शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील चर्चेत आले. सांगोल्यातून शिवसेनेच्या तिकिटावरून निवडून आलेल्या शहाजीबापूंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनीची इच्छा व्यक्त केली.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर सुरुवातीला शिवसेनेच्या 39 आमदारांनी शिंदे यांना साथ दिली होती. त्यात सोलापुरच्या सांगोला मतदारसंघातील शहाजीबापू पाटील होते. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले आमदार आधी सुरतमध्ये त्यानंतर गुवाहाटीत राहिले होते. गुवाहाटीत असताना शहाजीबापू पाटील यांचा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल… ओक्के मदी सगळं’ हा डायलॉग लोकप्रिय झाला. सोशल मीडियावर ‘काय झाडी, काय डोंगार…’ या डायलॉगने त्यावेळी धुमाकूळ घातला होता. उद्धव ठाकरे सरकार गडगडल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा हे सर्व आमदार गोव्यामध्ये होते.

- Advertisement -

हेही वाचा – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हाल, गृहमंत्र्यांच्याच गावात बंदोबस्तावरील पोलीस उपाशी

अवघ्या 10-12 दिवसांत शहाजीबापू पाटील यांच्यासह या आमदारांनी तीन राज्यांचा दौरा केला. पण शहाजीबापू पाटील यांनी अद्याप ताडोबा सफारी केलेली नाही. 1995मध्ये त्यांनी शेकापच्या गणपतराव देशमुख यांचा पराभव केला आणि प्रथमच ते विधानसभेवर गेले. त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 या चारही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2019मध्ये ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. अशा प्रकारे दोनवेळा आमदारकी मिळून आणि वर्षातील एक अधिवेशन नागपूरमध्ये असतानाही, त्यांची ताडोबाला जायची इच्छा अद्याप पूर्ण झालेली नाही. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, वयाची 66 वर्षे झाली, पण ताडोबाला जाणे झाले नाही. विठ्ठलाच्या कृपेने तो योग येईल, तेव्हा मी ताडोबा बघेन, असे ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – कर्नाटक विधानसभेत सावरकरांचा फोटो लावण्यावरून गदारोळ, काँग्रेसचे धरणे आंदोलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -