घरताज्या घडामोडीराष्ट्रवादी आणि भाजपाचे दोन बडे नेते आज एकाच मंचावर, विद्यापीठातर्फे मिळणार डी लीट पदवी

राष्ट्रवादी आणि भाजपाचे दोन बडे नेते आज एकाच मंचावर, विद्यापीठातर्फे मिळणार डी लीट पदवी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असे दोन बडे नेते आज एकाच मंचावर कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दोघांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डी लीट पदवी मिळणार आहे. शरद पवार यांना आतापर्यंत 9 मानद पदव्या मिळाल्या आहेत. तर औरंगाबाद विद्यापीठात तिसऱ्यांदा हा सन्मान मिळत आहे.

राज्यातील हे दोन्ही बडे नेते पदवी स्वीकारण्यासाठी विद्यापीठात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा हा 68 वा दिक्षांत समारोह आहे. आज 1.5 लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमातील पदव्या बहाल करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले यांनी दिली आहे.

- Advertisement -

शरद पवार यांच्या संसदीय राजकारणाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रवादीनं औरंगाबादेत कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी नितीन गडकरी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत टोलेबाजी केली होती. दोन्ही पक्ष कट्टर राजकीय विरोधी असले तरीही शरद पवार आणि नितीन गडकरी यांची मैत्री महाराष्ट्रात ख्यात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नागरिकांना काही मौल्यवान अनुभवाचे बोल ऐकण्याची संधी मिळू शकते.


हेही वाचा : जेल आहे की मसाज पार्लर? ‘आप’च्या नेत्याला जेलमध्ये मिळतेय VIP ट्रीटमेंट

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -