घरमहाराष्ट्रबीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा, हे ५ उमेदवार ठरले

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा, हे ५ उमेदवार ठरले

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड येथे पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परळीमधून धनंजय मुंडे, केजमध्ये नमिता मुंदडा, माजलगावमध्ये प्रकाश सोळंके, गेवराईमध्ये विजयसिंह पंडीत आणि बीडमध्ये संदिप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीड आणि गेवराईचा अपवाद वगळता इतर तीन उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. बीड मतदारसंघातून मागच्या वेळेस जयदत्त क्षीरसागर तर गेवराईमधून बदामराव पंडीत यांनी निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश करत मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्ष दिसून येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग झाल्यानंतर आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहे. आज त्यांनी बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये बीडमधील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

- Advertisement -

परळी मतदारसंघावर राज्याची नजर

बीड मधील परळी हा मतदारसंघ राज्यात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरत असतो. यावेळी देखील परळीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. २०१४ मध्ये धनंजय मुंडे यांचा २६ हजार मतांनी पराभव झाला होता. विशेष म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराने जवळपास १५ हजार मते घेतली होती. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असल्यामुळे मुंडे बहिण-भावामधील संघर्ष अटितटीचा मानला जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -