घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी फुटीच्या वाटेवर; शरद पवार म्हणाले, आम्ही नक्कीच...

राष्ट्रवादी फुटीच्या वाटेवर; शरद पवार म्हणाले, आम्ही नक्कीच…

Subscribe

मुंबईः राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटीच्या वाटेवर आहे. म्हणूनच शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, असा दावा दैनिक सामनातून करण्यात आला आहे. यावर शरद पवार म्हणाले, असे ज्यांनी छापले आहे त्यांनाच हा प्रश्न विचारा. असं काही होणार असेल तर आम्ही नक्कीच काळजी घेऊ.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मात्र शरद पवार हे राजीनाम्यावर ठाम होते. नवीन अध्यक्षपदासाठी शरद पवार यांनी समितीही नेमली. समितीने बैठक घेत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळून लावला.

- Advertisement -

त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असल्याचे जाहिर केले. त्यावेळी शरद पवार यांना दैनिक सामनात करण्यात आलेल्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटीच्या वाटेर आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, असा दावा दैनिक सामानातून करण्यात आला आहे. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे, असे शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर शरद पवार म्हणाले, आम्ही सर्व एकत्र आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडलेली नाही. त्यामुळे ज्यांनी राष्ट्रवादी फुटीचा दावा केला. त्यांनाच हा प्रश्च विचारा. जर आमच्या पक्षात असे काही होणार असेल तर आम्ही नक्कीच काळजी घेऊ, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

- Advertisement -

-अजित पवार दिल्लीला गेले ही चुकीची माहिती
– सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होणार यात तथ्य नाही
– पक्षात संघटनात्मक बदल करणार
– पक्षात उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे
– नव्या चेहऱ्यांना पक्षात संधी देणार
– राष्ट्रवादीचे नेते भाजपात जाऊ इच्छितात हे खोटं
– महाविकास आघाडी एकत्र काम करणार
– माझ्या निर्णयाची अजित पवारांना माहिती दिली होती
– सर्वांची माफी मागतो, सर्वांना राजीनाम्याच्या निर्णयाची कल्पना दिली नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -