घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमुंबईवरून आदेश आल्यानंतर आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

मुंबईवरून आदेश आल्यानंतर आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

Subscribe

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.

जालना : मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी आज राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांनी घटना घडलेल्या अंतरवली सरावटी या गावी जात आंदोलकांची भेट घेतली. याआधी त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी घडलेला प्रकार हा गंभीर असून, जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मुंबईवरून फोन आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी करीत सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले.(Lathi charge on protesters after order from Mumbai; Sharad Pawar’s attack on the rulers)

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. दरम्यान आज शरद पवार यांनी घटना घडलेल्या गावात जात आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, घडलेले प्रकार हा गंभीर आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यापूरता मर्यादीत राहणार नाही. म्हणून मी आणि जयंत पाटील यांनी घटनास्थळी येण्याची निर्णय घेतला. संकटात असलेल्यांना दिलासा देण्याची गरज असते. खरं सांगायचं म्हणजे मराठवाड्यात मोठा दौरा आयोजित करण्याच्या प्रयत्नात होतो. दुष्काळाची स्थिती पाहायची होती. जलाशयामधील पाणीसाठा अपुरा आहे. पुढील संकटे येणार आहे म्हणून दौरा आयोजित करणार होतो. मात्र ही घटना अचानक घडली. आज आम्ही तिघांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. आश्चर्य वाटेल अशा प्रकारचा बळाचा वापर करण्यात आला आहे. लहान मुले, वडीलधाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. जखमी आंदोलनकर्त्यांनी माहिती दिली की, आमची चर्चा सुरू होती अधिकारी बोलत होते, मार्ग निघेल असे दिसत होते. मात्र, जास्तीचे पोलीस तिथे बोलावण्यात आले. सर्व व्यवस्थित सुरू असताना मुंबईवरून सूचना आल्या आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दृष्टीकोण बदलला म्हणून त्यांनी बळाचा वापर सुरू केला. हवेमध्ये गोळीबार केला. लहान छऱ्यांचा वापर करण्यात आल्याचीही माहिती जखमींनी दिली असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना आरक्षण दिले होते

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, प्रत्यक्ष सराटीला गेलो तिथे तरुण होते, जालना आणि जालन्याबाहेरी होते. तर आमचे म्हणजेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार जेंव्हा होते तेव्हा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी यासाठी काहीच केले नाही. तर आंदोलनकर्त्यांना सांगितले की, तुमच्या आंदोलनाप्रती आस्था आहे. आंदोलन शांततेत सुरू ठेवा, जर चर्चेतून तोडगा निघाला तर काढा, मात्र जाळपोळ करू नका, यामुळे आंदोलकांची बदनामी होते.

हेही वाचा : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज: मराठा महासंघाने लावले फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले- …

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, चर्चा सुरू असताना असा बळाचा गैरवापर करणे चुकीचे आहे. स्त्री-पुरुष बघितले नाही तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावे, यातून मार्ग काढावा तर आम्ही मराठा आरक्षणाचा विषय इंडिया आघाडीच्या बैठकीतही चर्चील्या गेल्याचे त्यांनी सांगितले आणि जातीनिहाय जनगणना व्हावी याबाबतही चर्चा करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न

सर्व व्यवस्थीत सुरू असताना फोन आल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती जखमींनी दिली असे म्हणत शरद पवार म्हणाले की, आशिया खंडातील सर्व देशाचे लक्ष इंडिया आघाडीच्या बैठकीकडे होते. सर्व नेते बैठकीला हजर होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा उद्योग केला की काय अशी शंका आहे. तर मराठ्यांसाठी काय केलं असं जर विचारत असाल तर आमचे सरकार असताना आम्ही आरक्षण जाहीर दिले होते.

हेही वाचा : Jalna Lathi Charge : सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका, चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना आवाहन

मधुकर पिचड यांनी दिला होता राजीनामा

काल बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला होता की, गोवारी हत्याकांडावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. मग त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा का दिला नाही. तर यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 1994 म्हणजेच 28 ते 30 वर्षापूर्वी गोवारींचे प्रकरण झाले तेव्हा मी मुख्यमंत्री होतो पण नागपुरात नव्हतो. मी मुंबईत होतो. तेव्हा आदिवासी कल्याण मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी असे केले होते. आता कोण जबाबादारी घेतोय त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, मुंबईतील घटनेनंतर तेव्हाचे गृहमंत्री यांनी राजीनामा दिला होता असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -