घरताज्या घडामोडीमी मुख्यमंत्री असतानाही दंगल पण... पवारांची फडणवीसांवर टीका

मी मुख्यमंत्री असतानाही दंगल पण… पवारांची फडणवीसांवर टीका

Subscribe

शरद पवार यांच्या नागपूर दौऱ्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप कार्यकारणीच्या बैठकीतील भाषणाचाही उल्लेख केला आहे. त्रिपुरातील घटनेच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अतिशय संवेदनशीलपणे प्रतिक्रिया अपेक्षित होती. अशा विषयावर संवेदनशीलपणे बोलणारा नेता म्हणून फडणवीस बोलणे अपेक्षित होते. पण फडणवीसांची भूमिका संवेदनशीलता दाखवण्याएवजी राज्यकर्त्यांना लक्ष्य करणारी होती. कुठल्याही अतिशय संवेदनशील प्रश्नावर बोलताना पक्षीय भूमिका घेणे अपेक्षित नसते.

मीदेखील मुख्यमंत्री असताना ९३ साली दंगलीसारख्या संवेदनशील प्रकरणात राज्याच्या हिताची भूमिका घेतली. पण फडणवीस ज्या पद्धतीने या संवेदनशील विषयात बोलले त्याबद्दल आश्चर्य वाटले. सरकार आणण्यासाठी विरोधक अतिशय आसुललेले आहेत, पण एखाद्या संवेदनशील विषयावर बोलताना वास्तवाचे भान राहू नये, ही बाब अतिशय गंभीर असल्याचे पवार म्हणाले. शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संपुर्ण प्रकरणावर पवारांनी उत्तर दिले.

- Advertisement -

काय म्हणाले पवार 

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असे सांगत पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी मुंबईतील ९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत नवाब मलिकांनी जमीनीचा व्यवहार केला असल्याचा आरोप केला. तसेच हे सगळे पुरावे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचे स्पष्ट केले होते. या पुराव्यांबाबतच देवेंद्र फडणवीस यांनी पवारांकडे पुरावे दिले का ? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला.

मुंबईतील ९३ च्या बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असणाऱ्या लोकांसोबत नवाब मलिक यांनी व्यवहार केला असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यामध्ये कुर्ल्यातील काही मालमत्ता या स्वस्त दराने खरेदी केल्याचा आरोप नवाब मलिकांवर फडणवीसांनी केला होता. पण या संपुर्ण प्रकरणातील पुरावे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. या विषयावर आजच्या पत्रकार परिषदेत पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मला कोणतेही पुरावे फडणवीसांनी पाठवलेले नाहीत. त्यामुळे नवाब मलिकांवर केलेल्या आरोपांबाबत एकप्रकारे फडणवीसांची पोलखोल करण्याचे काम शरद पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले.

- Advertisement -

फडणवीसांनी मलिकांविरोधातील पुरावे पाठवले का?, पवार म्हणाले…

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -