जातीयवादावरुन केलेल्या वक्तव्याचा आस्वाद घेतला, शरद पवारांचे टीका करणाऱ्यांना उत्तर

Sharad Pawar slams bjp leader said People are smart teach a lesson politicians when they make a mistake
जनता हुशार, राजकारणी चुकल्यावर धडा शिकवते, शरद पवारांचे श्रीलंका पाकिस्तानच्या अराजकतेवर प्रतिक्रिया

मी जातीयवादावरुन करण्यात आलेल्या वक्तव्याचा आस्वाद घेतला. जातीयवादावरुन वक्तव्य करणाऱ्यांना लोक हसतात अशी टीका राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीयवाद वाढला आणि तो शरद पवारांमुळे वाढला असल्याची टीका राज ठाकरेंनी जाहीर सभेतून केली आहे. शरद पवार यांनी साताऱ्यातून राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सातारा दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. शरद पवार म्हणाले की, विनोदी वक्तव्य कोणी केले तर त्या विनोदाचा मी आस्वाद घेतला आहे. या प्रकारची वक्तव्य केल्यावर लोकं हस्तात. याच्यावर कोणाचा विश्वास बसणार आहे. ज्या लोकांनी आयुष्यभर अशा सगळ्या प्रवृत्तीच्याविरोधात भूमिका घेतल्या पण सौम्य पणाने आक्रस्तळेपणाने नाही. अशावेळी कोणी वक्तव्य केलं तर लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत. मग ते बोलतात विसरुन जाता. जे बोललेत त्यांचे कोणी आठवणीत ठेवलंय आठवत नाही असा टोला नाव न घेता शरद पवार यांनी राज ठाकरेंवर लगावला आहे.

जातीयवादावरुन शरद पवारांनी यापूर्वीच दिलंय उत्तर

जातीयवादावरुन शरद पवार यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, जातीयवादी उल्लेख हा माझ्या नावाने का सांगत आहेत, हे कळालेल नाही अशा शब्दात शरद पवार यांनी जातीयवादाच्या मुद्द्यावर आज सविस्तर खुलासा केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे पहिले अध्यक्ष छगन भुजबळ होते. त्यानंतर मधुकरराव पिचड, अरूण गुजराती, सुनिल तटकरे ही समाजातील सगळ्या घटकांनी घेऊन जाणारी पक्षाची नीती होती. त्यामधून पक्षाची नीती ही कोणतीही जातीयता दर्शवत नाही. राज ठाकरेंकडे बोलायला काही नाही, म्हणून ते बोलत आहेत, अशा शब्दात शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.


हेही वाचा : नवनीत राणांच्या ‘एमआरआय’वर शिवसेनेचे सवाल; लिलावती रुग्णालय प्रशासनाला धरलं धारेवर