घरमहाराष्ट्रBreaking : शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादी निवड समितीने फेटाळला

Breaking : शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादी निवड समितीने फेटाळला

Subscribe

आज (ता. 05 मे) राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीला पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात पक्षाची पत्रकार परिषद घेण्यात आली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पवारांच्या या घोषणेनंतर पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरूवात केली. तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाहेर गेल्या तीन दिवसांपासून कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. यासाठी आज (ता. 05 मे) राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली.  यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात पक्षाची पत्रकार परिषद घेण्यात आली.

हेही वाचा – राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष पदाबाबत संजय राऊत यांची महत्त्वपूर्ण टिप्पणी, म्हणाले…

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष असल्याने याबाबतची जबाबदारी त्यांनी मला दिली होती. निवड समितीत ही माझे नाव पहिले होते. 02 मे रोजी झालेल्या कार्यक्रमात ते असा निर्णय जाहीर करतील याची कोणालाही कल्पना नव्हती. त्यादिवशी सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर पक्षाच्या सर्वच नेत्यांनी पवारसाहेबांची भेट घेतली. आज देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची गरज आहे, असे सांगण्यात आले.

देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या कामांची स्तुती करण्यात येत आहे. देशातील महत्त्वाच्या नेत्यांकडून मला, सुप्रिया सुळे यांना फोन येत आहे. जनतेची भावना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून दिसून आली. गेल्या दोन ते तीन दिवसांत पक्षाबाबत प्रेम दिसून आले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत, असेही यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

पवारसाहेबांनी आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतला. पण आज आम्ही केलेल्या ठरावानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते, आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आदरणीय पवारसाहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांनी सर्वानुमते पक्षाध्यक्ष पदी कायम राहावे, अशी विनंती करण्यात आहे, असे या ठरावात लिहिण्यात आले असल्याचे प्रफुल्ल पटेल यांच्याकडून वाचून दाखवण्यात आले. त्यामुळे आता शरद पवार याबाबत नेमका काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

“शरद पवारांना पर्याय नाही, पवार साहेबांच्या नावाने आम्ही ठराव केला आहे. प्रफुल्ल पटेल आणि आमचे वरिष्ठ राष्ट्रीय पातळीवर काम करणारे पीसी चाको आणि सर्व मान्यवर व्हा. बी. सेंटरमध्ये जातील आणि ते पवार साहेबांना कल्पना देतील,” असे जंयत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -