घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी पक्षाध्यक्ष पदाबाबत संजय राऊत यांची महत्त्वपूर्ण टिप्पणी, म्हणाले...

राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष पदाबाबत संजय राऊत यांची महत्त्वपूर्ण टिप्पणी, म्हणाले…

Subscribe

शरद पवार यांच्या निर्णयानंतर सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पण त्यांच्या या निर्णयाबाबत आता ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण असे मत व्यक्त केले आहे.

शरद पवार यांच्या निर्णयानंतर सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण हे सध्या पवार यांच्या अवतीभवती फिरत असल्याचे दिसून येत आहे. पण त्यांच्या या निर्णयाबाबत आता ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण असे मत व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी राजीनाम्याबाबत घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असूच शकत नाही, असे संजय राऊत यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – Sanjay Raut : राजकारणात अपघाताने काहीही घडत नाही…, संजय राऊत यांचे ट्वीट

- Advertisement -

याबाबत बोलताना ते म्हणाले की, “शरद पवार यांचा राजीनामा हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असू शकत नाही. आपण राजकारणात आहोत. आपलं सध्याचं राजकारण हे विरोधी पक्षाचे राजकारण आहे. आपली लढाई ही देशातील हुकूमशाही विरोधात आहे. अशावेळी सगळ्यांनी आपापले स्तंभ पकडून ठेवले पाहिजे. आपापले पक्ष उभे केले पाहिजे. शरद पवार यांच्या नावाभोवतीच त्यांचा पक्ष उभा आहे,” असे राऊतांकडून सांगण्यात आले.

ज्याप्रमाणे शिवसेना आधी बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नावाभोवती आहे. किंवा लालू प्रसाद यादव यांचा पक्ष त्यांच्या नावाभोवती आहे. त्यामुळे किमान लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत त्यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

राजीनाम्याचा निर्णय नक्कीच घ्यावा लागेल. बाळासाहेबांनी पण हा निर्णय घेतला होता. आपल्या हयातीत त्यांनी पक्षाचे काम करण्यासाठी कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली होती. पण ही आमच्या पक्षाची भूमिका होती. निर्णय हा नक्कीच घ्यावा लागतो. याविषयी दुमत नाही. पण आज त्यांची गरज आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
आज होणाऱ्या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली आहे. एकीकडे कार्यालयाच्याबाहेर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे भजन-कीर्तन करण्यात येत आहे. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा. तसेच याबाबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -