घरताज्या घडामोडीधरणांमध्ये साचलेल्या गाळाबाबतचा विषय सरकारने गांभीर्याने घ्यावा, शशिकांत शिंदेंची मागणी

धरणांमध्ये साचलेल्या गाळाबाबतचा विषय सरकारने गांभीर्याने घ्यावा, शशिकांत शिंदेंची मागणी

Subscribe

मुंबई – राज्यातील अनेक धरणांमध्ये गाळ साचलेला आहे. कोयनासारखी अनेक धरणे आहेत जी ऑगस्टमध्येच भरायला लागली आहेत. धरणांचा पाणीसाठा कमी होतोय, धरणात गाळ असल्यामुळे पुढील वर्षी मार्चमध्येच दुष्काळाची समस्या जाणवू शकेल. धरणांमधील गाळ कमी केला तर अतिवृष्टीनंतरची पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही. हा विषय सरकारने गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

ढगफुटी आता सर्रास व्हायला लागली आहे. त्यामुळे मदत करण्यासाठी एका दिवसाचा अतिवृष्टीचा निकष लागू होत नाही. त्यामुळे ढगफुटीसंदर्भात निकष बदलले गेले पाहीजेत, असेही आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी उत्सवाला ऑलिम्पिकमध्ये नेऊ, गोविंदांना शासकीय नोकरीत आरक्षण देऊ. उल्हासनगरमध्ये एका मद्यपीने दोरखंडावरुन हंडी फोडली. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने कोर्टात सांगितले की शासकीय नोकरी मिळावी म्हणून त्याने असे कृत्य केले. आता शासकीय नोकरी कोणत्या थराला द्यायची, हे अजून ठरायचं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय जाहीर करण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी देखील सरकारने चढाओढ करावी, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला.

केंद्राने इतर राज्यांना मदत केली आहे. पण मागील महाविकास आघाडी सरकार त्यांच्या विचारांचे नसल्यामुळे दुजाभाव दाखवला गेला असेल. पण आता ईडीच्या माध्यमातून का असेना नवीन सरकार आणले आहे. त्यामुळे केंद्रातून आता महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त मदत आणणे आवश्यक आहे. यावेळी महाराष्ट्राबाबत दुजाभाव केला जाऊ नये, अशी अपेक्षाही आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

हेेही वाचा : देवेंद्र और हम साथ साथ, मेरा भी नाम.., मुख्यमंत्र्यांची विरोधकांसमोर तुफान फटकेबाजी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -