घरमहाराष्ट्रसुप्रिया सुळे बसल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर? राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे गटाची पोलखोल

सुप्रिया सुळे बसल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर? राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे गटाची पोलखोल

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे कारभार करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीने केला. खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून कारभर करत असताना फोटो पोस्ट करत राष्ट्रवादीने आरोप केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला होता. ज्यावरून काल दिवसभर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्योरोपाच्या फेरी रंगत होत्या. दरम्यान हा फोटो निवासस्थानवरील असल्याचे म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी वादावर पडदा टाकला. हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो ट्विट केला आहे. ज्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शीतल म्हात्रे यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीने आक्रमक होत तो फोटो मॉर्फ केल्याचे म्हटले आहे. तसेच फोटो ट्विट केल्याबद्दल शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांची माफी मागावी नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करु असा इशारा शिंदे गटाला दिला आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवबंधन सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांना दांड्याने मारण्याची भाषा करणाऱ्या शीतल म्हात्रे यांनी अचानक भूमिका बदलून शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर सातत्याने त्यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले. यात काल श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर होणारी टीका पाहता शीतल म्हात्रे त्यांच्या मदतीला धावून आल्या आहेत. शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो व्हायरल केला आहे. त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) बसल्याचे दिसत आहे. शीतल म्हात्रेंनी हा फोटो ट्विट करत, हा फोटो बघा कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र सुप्रिया सुळेंच्या या फोटोवरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण हा फोटो मॉर्फ केल्याचे समोर आलं आहे.

राष्ट्रवादी आक्रमक होत केली शिंदे गटाची पोलखोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शीतल म्हात्रेंनी ट्विट केलेल्या फोटोवर आक्रमक भूमिका घेतली आहे. सुप्रिया सुळे यांचा मॉर्फ फोटो शीतल म्हात्रेंनी पोस्ट केला आहे. त्यांची प्रतिमा मलीन करण्याच्या स्पष्ट हेतू या फोटोतून दिसत आहे. मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई करावी. तसेच शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया ताईंची माफी मागून पोस्ट डिलीट करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा क्रास्टो यांनी दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनीही हा फोटो मॉर्फ केल्याचे म्हणत शीतल म्हात्रे यांच्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. हा फोटो २३ एप्रिल २०२१ रोजी कोव्हिड उपाय योजनांबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या संवादादरम्यानचा आहे. ज्यात राज्यातील महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे वर्षा या शासकीय निवासस्थानातून तर तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे , गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बैठकीस मंत्रालयातून सहभागी झाले होते. त्यावेळेचा हा फोटो आहे, अशी माहिती आदिती नलावडे यांनी देत शीतल म्हात्रेंचा दावा खोडून काढला आहे,

आदिती नलावडे यांनी, आता त्यांना सांगा काय ते Editing, काय ते Morphing, सर्व कसं ओके करणार आहेत पोलीस.. असं ट्विट करत वरळी पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.


खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -