घरताज्या घडामोडीसत्तारांचा राजीनामा ही अफवा; खोतकरांचा दावा

सत्तारांचा राजीनामा ही अफवा; खोतकरांचा दावा

Subscribe

'अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला नसून ही तर केवळ अफवा आहे', असा दावा शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केला आहे.

‘अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला नसून ही तर केवळ अफवा आहे’, असा दावा शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केला आहे. तसेच सत्तार उद्या, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहे. त्याचप्रमाणे सत्तार आणि माझे बोलणे झाले आहे. त्यामुळे त्यांची कोणतीही नाराजी नाही, अशी माहिती खोतकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

काय म्हणाले खोतकर?

माझे आणि सत्तारांचे बोलण झाले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला या केवळ अफवा आहेत. त्यांची कोणतीही नाराजी आता नाही. त्यामुळे आता हा विषय संपला आहे. त्याचप्रमाणे सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा देखील केली आहे. त्याप्रमाणे सत्तार उद्या, रविवारी दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्र्यांची मातोश्री येथे भेट घेणार असून ते या सर्व विषयांवर चर्चा करतील. त्यामुळे मी त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचे मी खंडन करतो.

- Advertisement -

..यामुळे दिला राजीनामा

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. खाते मिळण्यापूर्वीच अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाचा शिवसेनेच्या एका नेत्याकडे राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते. तसेच कॅबिनेट मंत्रिपद न दिल्याने ते नाराज होते, असे सांगण्यात येत आहे. अब्दुल सत्तार हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच औरंगाबादमधील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या समिकरणावरूनही ते भाजपाच्या जवळ असल्याचे दिसून येत असल्याच्या चर्चा देखील चांगल्याच रंगू लागल्या आहेत.


हेही वाचा – ‘लग्नाच्या बोहल्यावर उभं राहण्याआधी नवरा पळला’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -