घरमहाराष्ट्रमुंबई महापालिका जिंकण्यासाठीच PM मोदींचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत; संजय राऊतांचा टोला

मुंबई महापालिका जिंकण्यासाठीच PM मोदींचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत; संजय राऊतांचा टोला

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांकडून टीकास्त्र डागलं जात आहे. मुंबईत आज मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ केला जाणार आहे. मात्र गेल्या महिन्याभरात मोदी दुसऱ्यांदा मुंबईत येत आहेत. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मोदी मुंबई दौऱ्यावर येत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यात आता शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी देखील मोदींच्या मुंबई दौऱ्यावर खोचक टीका केली आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी PM मोदींचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत पण राहू शकतो, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.

…तरीही मुंबई महानगरपालिका शिवसेनेच जिंकेल

राऊत म्हणाले की. जोपर्यंत महापालिकेच्या निवडणुका होत नाही, ते स्वत: तारीख ठरवत नाहीत तोपर्यंत कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत पण राहू शकतो. कारण मुंबई महानगरपालिका निवडणुक जिंकण्यासाठी मुंबई महाराष्ट्रातील भाजप किंवा मिंधे गटाचे लोकं असमर्थ आहेत, ते जिंकूच शकत नाहीत. अर्थात मोदी जरी आले तरी किंवा अख्खा देश जरी लावला जसे इतर राज्यात लावतात… तरीही मुंबई महानगरपालिका शिवसेनेच जिंकेल याची पूर्ण खात्री असल्यामुळे ते त्यांच्याकडून सारखा मोदींचा पत्ता टाकला जात आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिका पंतप्रधान मोदींना जिंकायची आहे

मग पंतप्रधान मोदींवर सारखी टीका करायची नाही, मी करू शकतो. दिल्लीत पार्टमेंट सुरु असताना अनेक महत्त्वाचे विषय सुरु असताना अदानीसारख्या विषयांवरून विरोधकांनी घेरलं असताना त्यावर उत्तर न देता पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत. वंदे भारत ट्रेन हे निमित्त आहे. पंतप्रधान मोदींना मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे. हे फार महत्वाचं आहे. मुंबई महापालिका पंतप्रधान मोदींना जिंकायची आहे. ठीक आहे आम्ही सुद्धा इथे तयार आहे, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.

अदानींच्या मागे मोदी ही शक्ती आहे का?

राज्यसभा आणि लोकसभेत विरोधी पक्षाने पंतप्रधानांसमोर अक्षरश: गोंधळ घातला, त्यांच भाषण होऊ दिलं नाही. पंतप्रधान गोंधळात बोलत राहिले ठीक आहे पण विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर देण्यासाठी मागे का हटले? राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी फार सोप्पे प्रश्न विचारले होते. प्रश्नपत्रिका फार सोप्पी होती की, अदानींच्या मागे कोणती महाशक्ती होती? कोणती शक्ती आहे की, जे श्रीमंतांच्या यादीत 400, 500, 600 या नंबरवरून दुसऱ्या क्रमांकावर आले, हा प्रश्न विचारत असताना सत्ताधारी बाकावरून मोदी मोदी अशा गर्जाना होत होत्या, म्हणजे अदानींच्या मागे मोदी ही शक्ती आहे का, आपोआपचं ते उघडे पडत आहेत, असंही राऊत म्हणाले.

- Advertisement -

राहुल गांधींनी विचारलं की, मोदी आणि अदानी किती वेळा एकत्र परदेशात गेले? याचं उत्तर सोपं होतं. प्रश्नोत्तराच्या तासाला अशा अनेक प्रश्नांना उत्तरं दिली जातात. मोदी कठीण प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. ती उत्तरं चुकतात. या प्रकरणाची संयुक्त समितीच्या माध्यमातून चौकशी व्हावी आणि देशात अदाणींबाबत प्रश्न उपस्थित होत असताना त्याला उत्तर द्यायला काय हरकत आहे? असा प्रश्नही राऊतांनी केला आहे.


उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडणार होते! शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा पुनरुच्चार


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -