घरमहाराष्ट्रकानामधील बोळे काढून, कान साफ करा, नाही तर...; राऊतांचा मुनगंटीवारांना खरमरीत टोला

कानामधील बोळे काढून, कान साफ करा, नाही तर…; राऊतांचा मुनगंटीवारांना खरमरीत टोला

Subscribe

राज्यातील सरकार फेब्रुवारीनंतर टीकले नाही तर खासदार संजय राऊत राज्यसभेचा राजीनामा देणार का? असं थेट आव्हान काल राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिले होते. या आव्हानावरून आज खासदार राऊत यांनी मुनगंटीवारांना खरमरीत टोला लगावला आहे. काल सरकारमधील एक शहाण्या मंत्र्यानी मला आव्हान दिले की, मार्चपर्यंत सरकार पाडून दाखवा, पण त्यांनी जरा कानामधील बोळे काढा. कान साफ करा, नाही तर पाठवतो एक कानकोरनं, अशा शब्दात राऊतांनी मुनगंटीवारांच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सरकार पाडून दाखवा काय, सरकार पडेल

राऊत म्हणाले की, न्यायालयाचा निकाल फेब्रुवारीपर्यंत लागणे अपेक्षित आहे आणि त्यानंतर सरकार पडेल, असं मी म्हटलं. माझी, पक्षाची भूमिका स्पष्ट असताना अतिशहाणे लोकं जनतेची दिशाभूल करत आहेत. सरकार पाडून दाखवा काय, सरकार पडेल असा दावा पुन्हा राऊतांनी केला आहे.

- Advertisement -

सरकार पाडण्यासाठी एक पक्ष फोडण्यात आला, पैशांचा वारेमाप वापर करण्यात आला

राऊत पुढे म्हणाले की, आम्ही सर्व प्रकारच्या लढाईला तयार आहोत. गेल्या ४ ते ५ महिन्यापासून राज्यात घटनाबाह्य सरकार राज्य करतयं, निर्णय घेतय, भ्रष्टाचार करतय, अनेक गोष्टी करत आहे. हे राज्याच्या, देशाच्या हिताचं नाही. महाराष्ट्रातील या प्रकरणावरुन देशात आणि जगात काय मेसेज जाणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी सांगितले आहे, या देशात लोकशाही न्याय व्यवस्था आहे की नाही महाराष्ट्राबाबत जो निकाल लागेल त्यावरून स्पष्ट होईल. आमची बाजू न्यायाची, सत्याची आहे. सत्यमेव जयते हे बीरूद तेजाने तळपणार असेल तर आम्हाला कायद्याच्या चौकटीतला न्याय मिळेल, आम्ही सत्याच्या पलीकडे काहीच मागत नाही. ज्यापद्धतीने एक सरकार पाडण्यासाठी एक पक्ष फोडण्यात आला, पैशांचा वारेमाप वापर करण्यात आला, आमदार पळवून नेण्यात आले. अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने पक्षात फूट पाडली, त्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली, त्या कारवाईसंदर्भातील सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आलं आहे, गेल्या चार महिन्यापासून निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय असेल आम्ही तारखांना सामोरे जात आहे. या एका महत्वाच्या खटल्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. असही राऊत म्हणाले.

सरकारला वाटतंय, महाशक्ती पाठीशी असल्यामुळे हे घटनाबाह्य सरकार चालत

तारखांवर तारखा पडतायतं आणि घटनाबाह्य सरकार मिश्किलपणे हसतयं, त्यांना असं वाटतय की त्यांच्यावर कोणतीच कारवाई होऊ शकत नाही. एक महाशक्ती पाठीशी असल्यामुळे हे घटनाबाह्य सरकार चालत राहिलं. पण महाशक्ती असेल किंवा अन्य काही असेल आमचा या देशाच्या न्याय शक्तीवर, न्यायदेवतेवर विश्वास आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे कारण हे सरकार मुडद्यात गुंतलेला प्राण

एखाद्या राज्यात किंवा देशात घटनाबाह्य सरकार चालत असेल तर ते रोखणं न्यायालयाचं काम आहे. संविधानानुसार, घटनेनुसार जर ते झालं असतं तर हे सरकार केव्हाचं पडलं असत. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की, फेब्रुवारी अखेरपर्यंत या खटल्याचा निकाल लागायला पाहिजे. या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे कारण हे सरकार मुडद्यात गुंतलेला प्राण आहे. हे जिवंत सरकार नाही, अशा शब्दात राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

जानेवारीपर्यंत सगळी प्रक्रिया झाली तर सरकार फेब्रुवारीत पडेल असे सांगत स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगावर विश्वास असायला पाहिजे. निवडणूक आयोगात आज सुनावणी आहे, ज्यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल अशी खात्री असल्याचेही राऊत यांनी म्हंटले आहे.


खोके सरकारचा आता रेसकोर्स विकून ती जागा बिल्डरांना देण्याचा डाव; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -