घरमहाराष्ट्रमी कोणाच्या श्रद्धेआड नाही, भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीकडूनच विरोध; सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं

मी कोणाच्या श्रद्धेआड नाही, भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीकडूनच विरोध; सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

मी कोणाच्याही श्रद्धे आड नाही, पण तरी राजकीय सूडबुद्धीतून मला विरोध केला जातोय, मला विरोध करण्यामागे भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीचे लोक आहेत. असा आरोप करत माझ्यामुळे जर संतांच्या, वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागते, असं म्हणत ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्ह्यास केला गेला. मी संत ज्ञानेश्वरांबद्दल काहीही वावगे बोलले नाही. माझ्या आईच्या संदर्भाने बोलत असताना मी ते विधान केल होतं. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, त्यांना माऊली म्हटलं गेलं. माझे वडील गेले त्यानंतर माझ्या आईने 15 एकर कोरडवाहू शेतीत काम करून चार भिंतीचं घर चालवलं. ती माझ्यासाठी विश्ववंदनीय असली पाहिजे, असं मी म्हटलं होतं, पण ते विधान कापलं गेलं, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

- Advertisement -

हरिभक्त पारायण गणेश शेटे ते हेच आहेत ज्यांनी 2019 – 2020 ला कोरोना काळात मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा मागण्यासाठी तत्पर होते. हे तेच लोक आहे आचार्य तुषार भोसले आणि त्यांचा कंपू आहे, ज्याने वारी बंद झाल्यावरून रान पेटवले होते, म्हणजे जी लोकं कधीच वारीत पायी चालली नव्हती त्या लोकांनी कोरोना काळात लोकांचे आरोग्य लक्षात न घेता निव्वळ राजकीय स्टंट केले, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

भाजपाकडून उघडलेली जी वारकरी आघाडी आहे, त्या वारकरी आघाडीतील हे लोकं आहेत. हे तेच लोकं आहेत ज्यांनी देहू आळंदीमध्ये पंतप्रधान मोदींना पाचारण करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलू दिलं नाही आणि त्याची सबब अशी सांगितली की, उपमुख्यमंत्री पद असंविधानिक आहे. आता उपमुख्यमंत्री पदावरील देवेंद्र फडणवीस जेव्हा निर्णय घेतात तेव्हा त्यांचे निर्णय असंविधानिक म्हणायचे का? असे सवाल करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरत प्रश्न विचारते तेव्हा माझ्या प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी अशाप्रकारे व्हिडीओतील फुटेज काढले जातात, असा आरोपही अंधारे यांनी केला आहे.

- Advertisement -

वारकऱ्यांकडून माझी प्रेत यात्रा काढली गेली, इतिहास साक्षी आहे की या देशात अनेक समाज सुधारकांच्या प्रेत यात्रा काढण्यात आल्या. त्यात माझीही एवढी दाखल घेतली गेली याचा आनंद, पण ती दखल राजकीय सूडबुद्धीने घेतली जातेय याचा खेद आहे. कारण वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, अस आवाहनही सुषमा अंधारे यांनी केलं आहे.

तीन दिवसांपूर्वी मी वारकरी महोत्सवात सहभागी झाले होते. तिथे सर्व वारकऱ्यांचा सत्कार करतानाही मी म्हटलं की, माझे आजोबा कबीर पंथी आहेत त्यामुळे मी कर्मकाडांपासून फार अलिप्त आहे. अंधारे, धुपारे, बुआबाजी, कर्मकांड या गोष्टी मला फार पडत नाहीत. पण मी चैतन्या मानणाऱ्यांपैकी एक आहे. माझं कुटुंब तुकारामांना मानणारं कुटुंब आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांतील माझी भाषणं काढून ऐकलीत तर मी त्यात तुकोबारायांचे संदर्भ सांगितले आहेत. मी संदर्भ सांगताना यांना मिरच्या का झोंबतात, असा परखड सवालही त्यांनी केला आहे.

तुकाराम महाराजांनी आम्हाला शिवकवलं आहे की, जेजे आपणासी ठावे, ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे, सकल जण. बुआबाजी, अंगारे, धुपारे असतील यामुळे सर्वसामान्य माणूस वेढीस धरला जात असेल, गाडला जात असेल तर तो अंधश्रद्धेच्या कच्छपी लागत असेल, कधी कधी नरबळीचे प्रयत्न होत असतील, त्यावर बोललं पाहिजे. महाराष्ट्राला आठवण करु दिली पाहिजे की महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा कायदा केला आहे, असही सुषमा अंधारे म्हणाले.

मी कोणाच्या श्रद्धेच्या आड कधी आलेली नाही, बुआबाजी, अंगारे, धुपारे यावर बोलली तरी माझी अंतयात्रा काढण्याचा प्रयत्न झाला. अंत्ययात्रा काढणं वारकरी परंपरेत बसत नाही. अंत्ययात्रेच्यावेळी कुणीही भगवा फेटा घालून बसत नाही. काल माझ्या अंत्ययात्रेत एक महाराज भगवा फेटा घालून बसलेले होते. भगवा रंग हा वारकरी संप्रदायाची पताका आहे. त्याचा रंग भगवा आहे. त्याचा तुम्ही अवमान करत आहात, असा टोलाही त्यांनी लगावला.


ज्या पक्षात सुषमा अंधारे, त्या पक्षाला मतदान नाही, वारकऱ्यांचा पवित्रा; नेमकं कारण काय?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -