घरमहाराष्ट्रशिवसेना, राष्ट्रवादीचा जल्लोष; भाजपच्या गोटात मात्र शुकशुकाट

शिवसेना, राष्ट्रवादीचा जल्लोष; भाजपच्या गोटात मात्र शुकशुकाट

Subscribe

राज्यात अखेर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे. निवडणूक निकालापासून लगेच सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे उत्साह निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामे दिल्याने महाविकास आघाडीचा सत्तेचा मार्ग मोकळा होताच शिवसैनिक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शालीमार येथील शिवसेना पक्ष कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताश्यांच्या गजरात जल्लोष करून आनंद साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे भाजप कार्यालय परिसरात मात्र शुकशुकाट दिसून आला. राज्यात अखेर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे. निवडणूक निकालापासून लगेच सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे उत्साह निर्माण झाला आहे.

शिवसेना पक्ष कार्यालयासमोर दिवाळी

शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एन.डी.पटेल रोडवरील भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला तर सेना, राष्ट्रवादीच्या गोटात मात्र शुकशुकाट दिसून आला. ८० तासांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच आता सर्व संपले, असा धक्का सत्तेचे स्वप्न बघणार्‍यांना लगेच बसला. पण, दुपारनंतर वातावरण बदलत गेले आणि शिवसैनिक व राष्ट्रवादीकडून जल्लोष सुरू झाला. याउलट अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपमध्ये शांतता पसरली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड होताच बुधवारी शहरासह जिल्ह्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन जल्लोष साजरा केला. आज सकाळी गंगापूररोडवरील प्रसाद सर्कल येथे महाआघाडीचे सर्व स्थानिक नेते एकत्रित जमले. त्यानंतर शालीमार येथील शिवसेना पक्ष कार्यालयासमोर जणू दिवाळीच साजरी करण्यात आली.

- Advertisement -

महिला पदाधिकाऱ्यांच्या फुगड्या

‘आवाज कुणाचा, शिवसेनेचा’, ‘आला रे आला शिवसेनेचा वाघ आला’, ‘जय भवानी जय शिवाजी’ ‘महाआघाडीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. ढोलताशे आणि आतषबाजीत हातात भगवे झेंडे घेतलेल्या महाआघाडीच्या नेत्यांनी नृत्यदेखील केले. तर महिला पदाधिकार्‍यांनी फुगड्यांचा फेर धरला.

भाजप गोटात शांतता

दोन दिवसांपूर्वी जल्लोष साजरा करणाऱ्या भाजपच्या गोटात मात्र बुधवारी सन्नाटा दिसून आला. शनिवारी ठिकठिकाणी जल्लोष करणारे भाजपचे नेते व कार्यकर्ते बुधवारी शांत झाले. एरवी छोट्या-मोठ्या घडामोडी वा प्रसंगावर बाहेर निघणारे भाजप कार्यकर्ते दिसून आले नाही.

- Advertisement -

राज्यघटनेचे उल्लंघन करत लोकशाहिची भाजपने हत्या केली. मात्र, अखेर सत्याचा विजय झाला. कोणताही आधार नसताना सरकार स्थापन करणारे देवेंद्र फडणवीस व भाजप तोंडघशी पडले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणारे सरकार राज्याला नवी दिशा देईल. आम्ही एकदिलाने काम करू हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार स्थापन होत असल्याने नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
डॉ. हेमलता पाटील, प्रवक्त्या काँग्रेस

भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, हे गेल्या पंधरवड्यात दाखवून दिले. सत्याचा विजय झाला. तोंडघशी पडलेल्या भाजपने आतातरी यातून धडा घ्यावा. राज्यातील शेतकरी व जनतेला न्याय देणारे सरकार स्थापन होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल.
विजय करंजकर, जिल्हाप्रमुख शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -