घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या सहकार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत, अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया

शिवसेनेच्या सहकार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत, अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया

Subscribe

स्क्रिप्ट वाचणाऱ्या कलावंतांना कधी कधी विस्मरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास यांनी वादग्रस्त विधान करुन महाविकास आघाडीतील वादावर ठिणगी पाडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरदसहस्तामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत असे वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आहे. यामुळे राष्ट्रवादी -शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेकडून अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावर पलटवार करण्यात आला असून शिवसेनेच्या सहकार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आलं असल्याने तुम्ही सत्तेची फळ चाखत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी दिली आहे. खासदारांचा वाद हा स्थानिक पातळीवरचा असून तिथल्या तिथे तो पाहिला जाईल असे शिवसेने खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरुन अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात वाद सुरू आहे. या वादावरुन थेट अमोल कोल्हे यांनी आता मुख्यमंत्र्यांवर भाष्य केलं आहे. त्यामुळे हा वाद आता थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. शरद पवार यांचा वरदहस्त डोक्यावर असल्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. याचा विचार श्रेयासाठी धडपड करणाऱ्यांनी घ्यावा. माजी खसदार यांना काही काम नसल्यामुळे वाद, भांडणे आणि श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहेत. असे विधान अमोल कोल्हे यांनी केलं होतं याच विधानावर अमोल कोल्हे यांच्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे.

- Advertisement -

स्क्रिप्ट वाचणाऱ्या कलावंतांना कधी कधी विस्मरण

अमोल कोल्हेंवर शिवसनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी निशाणा साधला आहे. खासदार कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली आहे. अमोल कोल्हे ज्या उद्धव ठाकरेंमुळे राजकारणात आले त्यांनाच ते विसरले आहेत. ज्या कलावतांना स्क्रिप्ट वाचून बडबड करण्याची सवय असते त्यांना कधी कधी विस्मरण होते तसेच काहीसे कोल्हेंचे झाले असल्याची खोचक टीका कान्हेरे यांनी केली आहे. राष्ट्रवादीमुळे शिवसेना सत्तेत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे? असा सवाल कोल्हेंना करण्यात आला आहे. शिवसेनेमुळे तुम्हाला सत्तेची फळे चाखायला मिळत आहेत हे विसरु नका असा टोला कान्हेरे यांनी लगावला आहे.

अभिनय करुन पोटापाण्याचे बघा

दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी पुढे म्हटलं आहे की, राज्यातील राज्य कारभार अजित पवार आणि शरद पवार हे सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन चालवत आहेत. अमोल कोल्हे यांनी विचार करुन नये त्यांची तेवढी क्षमता नाही. यामुळे दिग्दर्शकाने दिलेल्या स्क्रिप्ट वाचून आणि अभिनय करुनच पोटापाण्याचे बघावे असा खोचक टोला किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हे यांना लगावला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -