घरमहाराष्ट्रशिवसेना-भाजप युतीची घोषणा, ५०-५० % जागांचा फॉर्म्युला!

शिवसेना-भाजप युतीची घोषणा, ५०-५० % जागांचा फॉर्म्युला!

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील की एकमेकांविरोधात लढतील? हा प्रश्न अनेकदा चर्चेत आला होता. दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून त्याविषयी वेगवेगळी विधानं देखील केली जात होती. भाजपकजून युतीसाठी अनुकूल विधानं होती, तर शिवसेना मात्र आडमुठेपणे स्वबळाचाच नारा देत होती. अखेर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीविषयी चर्चा केल्यानंतर संभाव्य युती दृष्टिक्षेपात दिसू लागली.

गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील की एकमेकांविरोधात लढतील? हा प्रश्न अनेकदा चर्चेत आला होता. दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून त्याविषयी वेगवेगळी विधानं देखील केली जात होती. भाजपकडून युतीसाठी अनुकूल विधानं होती, तर शिवसेना मात्र आडमुठेपणे स्वबळाचाच नारा देत होती. अखेर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. येत्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. तर विधानसभेसाठी इतर मित्रपक्षांसाठी सोडलेल्या जागा वगळता उरलेल्या जागा ५०-५० टक्के वाटून घेण्याचा निर्णय युतीसंदर्भात घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळी वरळीतल्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये केली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्र्यांसोबतच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि दोन्ही पक्षांमधली दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती.

क्लिक करा आणि पाहा पत्रकार परिषद लाइव्ह!

- Advertisement -

विधानसभेला युती तोडणारे नाथा भाऊ मात्र अनुपस्थित

युतीची घोषणा झाली असली, तरी यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मात्र बाजूला ठेवण्यात आल्याचे पहायला मिळाले. प्रत्येक वेळी युतीच्या चर्चेला हजर असणारे नाथा भाऊ यावेळी मात्र गायब होते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे २०१४ ला विधानसभा निवडणुकीत खडसे यांनीच पत्रकार परिषद घेऊन २५ वर्षांपासून असलेली शिवसेना-भाजप युती तोडण्याची घोषणा केली होती. परंतु येत्या निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या युतीच्या घोषणेच्या वेळी मात्र खडसे अनुपस्थित होते. खडसे हे भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य असून, त्यांच्या अनुपस्थितीमुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, याबाबत एकनाथ खडसे यांना विचारले असता त्यांनी ‘२१ फेब्रुवारी रोजी जळगावात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असून त्याच्या तयारीत आपण व्यस्त आहोत. आपण अजिबात नाराज नाही’, अशी प्रतिक्रिया दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -