घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आता तरी निवडणुका लावा; आदित्य ठाकरेंची मागणी

महाराष्ट्रात आता तरी निवडणुका लावा; आदित्य ठाकरेंची मागणी

Subscribe

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. यात गुजरात निवडणुकीत भाजपकडे एकहाती सत्ता आहे. तर हिमाचलमध्ये काँग्रेस भाजपमध्ये संघर्ष सुरु आहे. यावर आता शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी जे कोणी या दोन्ही निवडणुकांमध्ये जिंकलेत त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्रातही आता निवडणुका लावा अशी मागणी केली आहे. आदित्य ठाकरे आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सीमाप्रश्नावरूनही शिंदे सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन जाऊ दे

आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात आता तरी निवडणुका लावा, आता घाबरण्याची काय गरज आहे? मुंबई, ठाणे, पुणे अशा अनेक महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रात एकदा लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन जाऊ दे. त्यामुळे आता महाराष्ट्रात निवडणुक घ्या, कारण महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार बसलं आहे. महाराष्ट्रात 40 आमदारांच्या आणि 12 खासदारांच्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या त्या अजून झाल्या नाही. आता एवढा मोठा विजय प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात निवडणुका घेण्यास काहीचं हरकत नाही. अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -

घाबरट सरकार राज्याला पुढे कसं नेणार?

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राने अजून संयम पाळला आहे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्राने अजून काही केलं नाही, ही एक चांगली गोष्ट आहे. शांततेच वातावरण राहिलं पाहिजे, पण संयमाचा अंत पाहू नका. बेळगावमध्ये दोन मंत्री जाणार असं सांगितलं पण बेळगावमध्ये हे मंत्री जाऊन करणार काय होते? चर्चा कोणाशी आणि कशावर करणार होते? जो प्रांत महाराष्ट्राचाच आहे त्यावर चर्चा होऊ शकते का? तिकडच्या मंत्र्यांनी दम दिल्यानंतर आमचे दोन मंत्री घाबरले, हे असं घाबरट सरकार असेल तर ते राज्याला पुढे कसं नेणार? असे अनेक खोचक सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.

कर्नाटकसाठी आमची गावं पळवणार का?

केस कोर्टात सुरु असताना या दोन्ही नेत्यांनी मध्यमार्ग काढावा आणि त्यावर पुढे निर्णय घ्यावा. पण आत्ताच्या घडीला कर्नाटकाकडून जे सुरु आहे ते योग्य नाही. आता गुजरात निवडणुकीत गुजरातमध्ये महाराष्ट्रातून जसे प्रकल्प पळवले तसे कर्नाटकसाठी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये आमची गाव पळवणार आहेत का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी काल खरा मुख्यमंत्री कोण हे सांगितले आहे. तरी देखील यांच्याकडून एक शब्द येत नाही हे असं कसं चालणार, म्हणून त्यांना शिवसेना नाव लावण्याचा काही अधिकार नाही. कारण जे घाबरट आहेत ते स्वत:ला शिवसेना म्हणूच नाही शकत. असं घाबरट सरकार महाराष्ट्राला पुढे नेऊ शकत नाही, असा गंभीर आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.


सीमावर्ती बांधवांच्या न्यायासाठी सर्व प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.शिवाजी जाधवांशी चर्चा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -