घरताज्या घडामोडीतीन चिलखत दूर करुन लढा आम्ही छातीवर वार करणारे आहोत, राऊतांचा भाजपवर...

तीन चिलखत दूर करुन लढा आम्ही छातीवर वार करणारे आहोत, राऊतांचा भाजपवर घणाघात

Subscribe

महाराष्ट्रात जी तीन चिलखतं परिधान करुन फिरताय ना ती बाजूला करा आम्ही छातीवर वार करणारे आहोत असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह यांनी पुण्यातून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यावर राऊतांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. महाराष्ट्रात येऊन आम्हाला शिकवू नका असेही संजय राऊत म्हणाले. तसेच काम नसेल तर कर्नाटकमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवा असा सल्ला राऊतांनी शाह यांना दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यावरुन घणाघात केला आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील सरकार उत्तम सुरु आहे. केंद्राने प्रयत्न करुनसुद्धा महाविकास आघाडी सरकारचे कवचं देखील उडाले नाही याचे दुःख आम्ही समजू शकतो. मी सांगतो जी तीन चिलखत घालून महाराष्ट्रात फिरताय ना, सीबीआय ईडी आणि एनसीबी ही तीन चिलखत घालून महाराष्ट्रात कुरघोडी करताय ना, ती दूर करुन महाराष्ट्रात लढा आम्ही छातीवर वार करणारे आहोत, असे राऊत म्हणाले. तसेच आम्ही असे पाठीमागून हल्ले प्रतिहल्ले करत नाही. शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहे. आम्हाला शिकवू नका आम्ही समोरूनच लढत आलोय असे संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.

- Advertisement -

पॉवर शेअरिंगमध्ये मुख्यमंत्री पद होते

वरळीमध्ये पुनश्च युती करण्याचे आणि हरिओम करण्याचा जो काही सोहळा पार पडला त्यामध्ये देशातील सर्व माध्यमवर्ग होता. त्यावेळी ठरलं होते सत्तेचा वाटप ५०-५० होणार, पॉवर शेअरिंगचा अर्थ काय असतो हे सांगायची गरज नाही. पॉवर शेअरिंग म्हणजे पावर ब्रोकर नाही आमच्याशी दगाबाजी केल्यानंतर हाच पावर ब्रोकिंगचा भाग होता. पावर शेअरिंगमध्ये मुख्यमंत्री पद होते. खोटं बोलू नका आणि पुण्यात तर बोलूच नका ती शिवरायांची भूमी आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना काम नसेल तर त्यांनी सांगावे कर्नाटकात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तिथे त्यांनी लक्ष द्यावे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

अमित शाह यांनी पुन्हा १०५ आमदार निवडून आणावे

शिवसेनेमुळे भाजपचे १०५ आमदार निवडून आले होते. अमित शाह यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी १०५ आमदारांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा १०५ निवडून आणून दाखवावे असे आव्हान संजय राऊतांनी दिले आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्यसुद्धा वैफल्यातून

सत्य ज्ञाय याचीत गर्जना घुमली आहे. अमित शाह काल पुण्यात आले त्यांचे वक्तव्य पूर्णपणे असत्याला धरून आहे. भाषणामध्ये शाह खर काय बोलले याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या सरकारविषयी आमच्या भूमिकांविषयी आमच्या हिंदूत्वाविषयी प्रश्न उपस्थित करुन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या २ वर्षापासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तरी जनता विश्वास ठेवायला तयार नाही. हे वैफल्य मी राज्याच्या नेत्यांकडे पाहतो आहे. पण त्यांचे केंद्रीय नेतेही त्याच वैफल्यातून महाराष्ट्रात येऊन बोलू लागले आहेत. हे पाहिल्यावर महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांना त्यांची दया आणि आश्चर्य वाटले असल्याचे राऊत म्हणाले.

शाह यांनी हे स्पष्ट करावं

हिंदूत्वाचा मुद्दा शिवसेनेने सोडला नाही आणि सोडणारही नाही. २०१४ साली आमच्यासारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला दूर करताना केवळ सत्तेसाठी आणि सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी शिवसेनेला दूर करा असे सांगणारे कोण होते. हे अमित शाह यांनी स्पष्ट कराव.

२०१४ साली आम्ही वेगळे लढलो होतो आणि प्रचंड ताकद, पैसा, केंद्रीय सत्ता याची कृत्रिम लाट असतानाही महाराष्ट्रात आम्ही चांगल्या प्रकारे लढलो आणि चांगला विजयसुद्धा संपादन केला होता. शिवसेनेला दूर करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला याचे उत्तर अमित शाह यांनी दिलं पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज न्यायालयात सुनावणी, कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई होणार?


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -