घरमहाराष्ट्रशिवसेनेला धक्का, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत पराभूत, राणेंची सरशी

शिवसेनेला धक्का, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत पराभूत, राणेंची सरशी

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला विशेषत: शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. सतीश सावंत आणि भाजप उमेदवार विठ्ठल देसाई यांना समसमान मतं पडली होती. त्यानंतर ईश्वरचिठ्ठीत विठ्ठल देसाई यांचं नाव आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं. सतीश सावंत यांच्या पराभवानंतर शिवसेनेत शांतता पसरली आहे.

भाजपच्या राजन तेलींचा पराभव, सुशांत नाईक विजयी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची शुक्रवारी मतमोजणी सुरु झाली. सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांना पराभूत करत भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यानंतर आता भाजपला देखील मोठा धक्का बसला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे सुशांत नाईक यांनी राजन तेलींना पराभूत केलं आहे.

- Advertisement -

सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून भाजपच्या राजन तेलींचा पराभव झाला आहे. राजन तेली यांचा परभाव करणारे सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत.

भाजपचे विजयी उमेदवार

भाजपचे प्रकाश बोडस विजयी
भाजपचे दिलीप रावराणे विजयी
भाजपचे मनीष दळवी विजयी
भाजपचे महेश सारंग विजयी
भाजपचे अतुल काळसेकर विजयी
भाजपचे विठ्ठल देसाई विजयी
भाजपचे बाबा परब विजयी

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -