घरदेश-विदेशघोषणा करणाऱ्यांनी केंद्राकडून दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा; राऊतांचा राणेंवर निशाणा

घोषणा करणाऱ्यांनी केंद्राकडून दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा; राऊतांचा राणेंवर निशाणा

Subscribe

महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहेत. त्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत. त्यांनी येताना दोन हजार कोटींचा चेक केंद्राकडून घेऊन यावा, असा निशाणा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम मंत्री नारायण राणे यांच्यावर साधला. राणे यांनी दोन दिवसांपूर्वी चिपळूण, महाडचा दौरा करत मदतीची घोषणा केली. यावरुन राजकीय श्रेयवादाची लढाई सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

संजय राऊतयांनी आज माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारवर देखील उपहासात्मक टोला लगावला. महाराष्ट्र सरकार हे आपल्या जनतेला सहाय्य आणि मदत करण्यास सक्षम आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत. पण केंद्राची जबाबदारी आहे. महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देत आहे. विशेषत: मुंबई. आता आम्ही तो काय हिशोब मागायला बसलो नाही आहोत. पण जबाबदारी केंद्राचीसुद्ध आहे. केंद्र आमचा बाप आहे असा विरोधकांना टोला लगावत केंद्राची मदत नक्की स्वीकारली जाईल, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्राचे काही मंत्री केंद्रामध्ये आहेत. त्यांनी येताना केंद्राकडून दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा. नरेंद्र मोदींच्या सहीचा चेक मिळाला तर आम्ही त्याचं वाजत गाजत स्वागत करू. कोकण, सातारा, सांगलीच्या लोकांना देऊ. कारण एकएक पै महत्त्वाचा आहे, असा चिमटा संजय राऊतांनी काढला.

राजकीय पर्यटन करू नका

मुख्यमंत्री विलासराव देशमुख गेले होते, त्यांच्यासोबत काही लोक होते. तेव्हा त्यांना पदावरून जावं लागलं. अशा घटना घडतात तेव्हा तिथे रेस्क्यू ऑपरेशन करताना डिस्टर्ब होतं. राजकीय नेत्यांनी आपल्यावर नियंत्रण ठेवावं. थोडा संयम ठेवावा. राजकीय पर्यटन करू नका, असं आवाहन करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

- Advertisement -

देशाला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची गरज

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. देशालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं ते म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -