घरमहाराष्ट्रव्हीपमुळे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे अडचणीत!

व्हीपमुळे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे अडचणीत!

Subscribe

अविश्वासाच्या ठरावावरुन शिवसेनेचे लोकसभेतील प्रतोद चंद्रकांत खैरे यांच्याकडून व्हीप जारी करण्यात आला होता. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्या अडचणी वाढल्या आहे. उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना प्रतोद पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे.

शुक्रवारी संसदेत भाजप सरकारविरोधातल्या विश्वासदर्शक ठरावावेळी सर्व खासदारांनी लोकसभेत उपस्थित राहावं यासाठी शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला होता. हा व्हीप शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्यातर्फे जारी करण्यात आला होता. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे लोकसभेतील प्रतोद पदावर आहेत. या व्हीपनंतर चंद्रकांत खैरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे.

मंत्र्यांचा व्हीप खोटा असल्याचा दावा

शिवसेनेचे लोकसभेतील प्रतोद चंद्रकांत खैरे यांच्या स्वाक्षरीने तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला होता. “अनिवार्य रुप से उपस्थित रहकर सरकार के पक्ष का समर्थन करें”, अशी या व्हीपमधली शेवटची ओळ होती. हा एक जुना व्हीप कट पेस्ट करून शिवसेना खासदारांना पाठवण्यात आल्याचं शिवसेनेचे नेते सांगत आहेत. हा व्हीप मीडियाकडे कसा पोहोचला, याची चौकशी उद्धव ठाकरे करणार आहेत. दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी व्हीप आपल्याकडून पाठवण्यात आला नाही, असे सांगितले आहे. त्यानंतर शिवसेनेमध्ये व्हीप कोणी जारी केला? यावरुन गोधळ सुरू झाला. शिवसेनेचा व्हीप अस्तित्त्वातच नव्हता, कुणीतरी खोडसाळपणाने खोटा व्हीप जारी केला असे शिवसेनेचे नेते सांगत आहेत. शिवाय, हा व्हीप हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये होता. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी तो व्हीप खोटा असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

अविश्वास ठरवावरून शिवसेनेत संभ्रम

दरम्यान, या सगळ्या गोष्टींमुळे शिवसेनेत प्रचंड संभ्रम निर्माण झाला. आज सकाळी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खासदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ‘उद्धव ठाकरे यांचा आदेश कळवला जाईल, त्यानुसार कृती करा आणि पूर्ण वेळ सभागृहात थांबा’, असा संदेश मातोश्रीवरुन पाठवण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेच्या सर्वच खासदारांनी लोकसभेतील अविश्वासाच्या ठरावावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

अविश्वासाच्या ठरावावर राऊत यांची प्रतिक्रिया

शिवसेना भाजपला बुलेट ट्रेन, नाणार, नोटबंदी, जीएसटी या सर्व गोष्टींवरुन विरोध करत आली आहे. यापुढे आम्ही भाजपासोबत निवडणूक लढवणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्याचबरोबर नाणार प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. अविश्वासाच्या ठरावावरील व्हीपमुळे शिवसेनेत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे ‘शिवसेना नक्की कोणाकडून?’ असा प्रश्न पडला होता. यावर संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘देशाच्या राजकारणात राहुल गांधींच्या जादूच्या झप्पीने झटका दिला आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशिर्वाद घेतला आहे. त्यांनी डोळा का मारला हे सुद्धा बघितलं पाहिजे. शिवसेनेने हिंमत आणि दम दाखवला आहे. चार वर्षांत किती नेते खोटं बोलले तेसुद्धा आता समोर आलं आहे. शिवसेनेकडून कोणताही व्हीप जारी झालेला नव्हता’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -