घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गात सेनेचाच उमेदवार; केसरकरांचे सुतोवाच

सिंधुदुर्गात सेनेचाच उमेदवार; केसरकरांचे सुतोवाच

Subscribe

शिवसेना-भाजपमध्ये युतीवरून संभ्रम असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच स्वतंत्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्यावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.

सध्या राज्याभरात आमागी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सरुवात केली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक राजकीय सुतोवाच केले आहे. ‘रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून सध्याचे खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी देण्यात येणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम असेल’, असे सुतोवाच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. यामुळे युती झाली तरीही ही जागा भाजपकडे जाणार नसून यामुळे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना स्वबळावरच लढावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी- सिंधुदुर्गमधील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघालेले आहे. शिवसेना-भाजपमध्ये युतीवरून संभ्रम असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच स्वतंत्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्यावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.


जाणून घ्या : Gmail च्या ३ नवीन फिचर्सविषयी…

शिवसेना-भाजपमध्ये युती होणार अशी चर्चा सुरु झाली होती. आता शिवसेनेने भाजपला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग हा मतदारसंघ कायमच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेला राहिलेला आहे. २००९ मध्ये राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी सध्याचे भाजपचे राज्यसभा खासदार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना धूळ चारली होती. मात्र, २०१४ मध्ये निलेश राणे यांचा विक्रमी मतांनी पराभव झाला होता. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांच्यावर विजय मिळविला होता. २०१९ च्या निवडणुकीमध्ये निलेश राणे की नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. शिवसेनेने आधीच आपला उमेदवार जाहीर केल्याने येत्या काळात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -