घरमहाराष्ट्रमहाडमधील कलांकारांनी निर्माण केला ‘संगत’ लघुचित्रपट

महाडमधील कलांकारांनी निर्माण केला ‘संगत’ लघुचित्रपट

Subscribe

श्री साईनाथ सिनेटोन निर्मित, यश थिएटर्स प्रकाशित ‘संगत’ हा लघुचित्रपट महाड येथील केसेरासेरा या पीजी थिएटरमध्ये शुक्रवारी 29 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. स्थानिक कलाकारांना बॉक्स ऑफीसवर संधी देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे लेखक भारत मोरे यांनी या वेळी सांगितले.

रंगमंचावर बरेच कलाकार काम करत असतात. मात्र स्थानिक कलाकारांना चित्रपटात काम करण्याची कधीच संधी मिळत नाही. ग्रामीण भागातील मुलांमध्येदेखील अभिनयाची आवड असते. चित्रपट सृष्टीच्या झगमगाटात स्थानिक कलाकार अनेक कारणास्तव मागे पडतात. त्यांना संधी उपलब्ध होत नाही. ती संधी श्री साईनाथ सिनेटोन आणि यश थिएटर्सने मिळवून दिली आहे. बॉक्सऑफीसवर काम करण्याची संधी ग्रामीण भागातील मुलांना मिळावी या उद्देशानेच संगत या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे, अशी माहिती यावेळी लेखक भरत मोरे आणि निर्माता रवी रवळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

महिला व त्यांचे प्रश्न हा सामाजिक विषय घेऊन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संपूर्ण शूटिंग महाड परिसरातच केले आहे. महाडमधील तरुण आणि होतकरु कलाकारांना या चित्रपटात अभिनयाची संधी देण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती करत असताना अनेक अडचणींबरोबर आर्थिक अडचणीचाही सामना करावा लागला. त्यामुळे चित्रपट पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला, अशी माहिती रवळेकर यांनी दिली. या लघुचित्रपटाला सेंसॉर प्रमाण पत्र व प्रॉडक्शन मान्यता मिळालेली आहे. थिएटर्सदेखील मिळाली आहेत. बॉक्स ऑफीसवर झळकणारा हा पहिलाच मराठी लघुचित्रपट असल्याची माहिती भरत मोरे यांनी दिली. या चित्रपटासाठी महाडमधील कलाकारांसह दोनशे जणांनी योगदान दिले आहे.

येत्या काळात ‘दावण’ हा तीन तासाचा चित्रपट करण्याचा मानस असल्याचे अनंत शिंदे यांनी सांगितले. या चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश चौधरी यांनी केले असून निर्माता रवि रवळेकर, कथा-पटकथा-संवाद भारत चंद्रकांत मोरे, कॅमेरा गणेश पवार, कलाकार अनंत शिंदे, सपना माने, सुप्रिया महाडिक, ओम गांगण, पराग बद्रीके, रोहन सकपाळ या स्थानिक कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -