घरमुंबईमुंबईत कलेचे विभागीय केंद्र होणार सुरू

मुंबईत कलेचे विभागीय केंद्र होणार सुरू

Subscribe

मुंबई ही कलानगरी असूनही मुंबईत राष्ट्रीय कला अकादमीचे केंद्र नाही, यासंंबंधी खंत सातत्याने कलाकार आणि कलारसिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईसह त्रिपुरा आणि इंदोरमध्ये लवकरच विभागीय केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा ललित कला अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव पाचारणे यांनी केली. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स महाविद्यालयात 60 व्या राष्ट्रीय कला मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मुंबईतील जे.जे. कला महाविद्यालयात सोमवारी गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते या कला मेळ्याचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार, बाबा योगेंद्र, राज्याचे कलासंचालक राजीव मिश्र, राष्ट्रीय कला गॅलरीचे संचालक अद्वैत गणनायक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 15 कलावंतांना प्रत्येकी 1 लाखांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यात प्रसिद्ध कलाकार वासुदेव कामत, जितेंद्र सुतार, सचिन चौधरी, जॉन डग्लस या महाराष्ट्रातील चार कलाकारांचा समावेश होता. मुंबईत विभागीय कला केंद्र नसल्याने विद्यार्थ्यांना चेन्नईला जावे लागते.

- Advertisement -

त्यांना 10 हजारांची शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती तुटपुंजी असून, कलावंतांना दरमहा 30 हजार शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही पाचारणे यांनी सांगितले. कला मेळ्यात 120 स्टॉल उभारले गेले असून, त्यात देशभरातील पेंटींग, मूर्तीशिल्प, मिश्रीत माध्यमासह अनेक माध्यमांच्या कलाकृती रसिकांना पाहता येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -