घर उत्तर महाराष्ट्र लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले श्री व्यंकटेश बालाजी मंदिर

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले श्री व्यंकटेश बालाजी मंदिर

Subscribe

नाशिक : त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त सोमेश्वरजवळील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात लाखो पणत्या प्रज्वलित करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरातील बालाजीच्या मुर्तीभोवती आकर्षक पणत्यांची आरास करण्यात आली होती. यावेळी लक्ष लक्ष श्री व्यंकटेश बालाजी मंदिर उजळून निघाले होते. असंख्य नाशिकरांनी हा दिव्यांचा दिमाखदार सोहळा अनुभवला. बालगोपालांसह जेष्ठ नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सोहळ्यात उपस्थितीत सोहळा पार पडला.

मंदिरात स्थापनेपासून येथे अखंड समयी तेवत आहे. मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. बालाजीच्या दर्शनासाठी व पणत्या प्रज्वलित करण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. दहा वर्षांपासून हा दिपोत्सव साजरा केला जातो. कोरोनाच्या निर्बंधामुळे दिपोत्सव साजरा करता आला नाही. पहिल्या वर्षी केवळ अकराशे पणत्या लावण्यात आल्या होत्या. मात्र आता गर्दी वाढू लागल्याने ही संख्या लाखोंवर गेली आहे. या उत्सवामध्ये महिलांसह बाळगोपाळ वयोवृध्द नागरिकांनी सहभाग घेतला.परिसरात काढलेल्या सुबक रांगोळया सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. मंदिराच्या प्रांगणात पणत्या प्रज्वलित झाल्याने मंदिराला झळाळी प्राप्त झाली होती. अनेक भाविक पणत्या प्रज्वलित करताना भाविकांनी कुटुंबियांसाबत सेल्फी काढताना दिसून आले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -